पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपने देशभर `मोदी@9`हे विशेष जनसंपर्क अभियान सुरु केले आहे. त्याअंतर्गत बुधवारी (ता.७) पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाने पत्रकारपरिषद घेऊन गेल्या नऊ वर्षात केलेल्या कामांचा पाढा वाचला. यावेळी त्यांनी अगोदर केंद्रात सत्तेत असलेल्या युपीए सरकारवर कडाडून हल्लाबोल केला.भाजप कडून बुधवारी(दि.७) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गेल्या नऊ वर्षात पिंपरी-चिंचवडच नाही,तर संपूर्ण देशातील न सुटलेला आणि गेली चाळीस वर्षे प्रलंबित असलेला रेड झोनचा प्रश्न येत्या वर्षभरात सोडवला जाईल असा दावाही मावळचे माजी आमदार बाळा ऊर्फ संजय भेगडे यांनी यावेळी केला आहे. यावेळी भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष भोसरीचे आमदार महेश लांडगे,पक्षाच्या चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, विधान परिषद सदस्या उमा खापरे आणि शहर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते