मुदगड एकोजी ग्रा.प.सदस्य नागनाथ कांबळे यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश
निलंगा- मुदगड एकोजी येथील भारतीय जनता पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य नागनाथ कांबळे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते भारतीय काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.यावेळी अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की,आदरणीय निलंगेकर साहेबांच्या विचारांचा व काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाचा प्रसार सामान्य माणसापर्यंत पोहचवण्याचे कार्य करावे.आपला पक्षामध्ये मान-सन्मान केला जाईल आपण पुढील येणाऱ्या काळामध्ये पक्षबांधणीसाठी व मजबुतीसाठी कार्य करावे अशा शुभेच्छा दिल्या.यावेळी एकोजी मुदगड येथील काँग्रेसचे जेष्ठ नेते मालिकार्जुन कुमारे,सुनील मुळे, उमाकांत मोहिते,उद्धव मस्के,पप्पू मोहिते,मधुकर मस्के,गुंडेराव कांबळे, विलास मस्के,बलभीम मोहिते,अशोक सूर्यवंशी,अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा.दयानंद चोपणे,जि.प.सदस्य सुरेंद्र धुमाळ,निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे इ.उपस्थित होते.