अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेस च्या वतीने काळ्या फिती लावून शासनाचा निषेध व अक्षय भालेराव यांच्या हत्येचा जाहीर निषेध
निलंगा-निलंगा तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या पदोन्नतीपर बदल्या झाल्यामुळे नुकतंच दहावी व बारावीचा चांगला निकाल लागल्यामुळे पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी सदरील विदयार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्र,जात प्रमाणपत्र,नॉन-क्रिमिलयेर,आर् थीक दुर्बल घटक प्रमाणपत्र,राष्ट्रीय प्रमाणपत्र ,इ प्रमाणपत्रे काढण्यासाठी तहसीलदार नसल्याने हे कामे करण्यास कंत्राटी ऑपरेटर एकच असल्याने खूपच गैरसोय होत आहे.यामुळे चांगली टक्केवारी घेऊन ही विधर्थ्यांना एक वर्ष शिक्षणापासून वंचित राहावे लागेल अशी दाट शक्यता आहे.तरी या कामासाठी चार अनुभवी ऑपरेटर व तहसीलदार यांची तात्काळ नियुक्ती करून सदरील विधर्थ्याचा प्रश्न मार्गी लावावा.त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील बौद्ध तरुण अक्षय भालेराव याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे याचा जाहीर निषेध करून मारेकऱ्यांना जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन देण्यात आले.त्या निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर,अशोकराव पाटील मित्र मंडळ जिल्हाध्यक्ष दयानंद चोपणे,निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे, निलंगा तालुकाअध्यक्ष मदन बिरादार,निलंगा शहराध्यक्ष मुजीब सौदागर,तुराब बागवान,शहानवाझ पटेल,अवेझ शेख,किरण पाटील,सावन पाटील,शब्दर कादरी,धनाजी चांदूरे,विशाल बिराजदार,सय्यद शेख,सोहेल शेख,मुक्तार बागवान,जगदीश सगर इ.स्वाक्षऱ्या आहेत.