• Thu. May 1st, 2025

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून BSNLसाठी 89,000 कोटी रुपयांच्या पुनरुज्जीवन पॅकेजला मंजुरी

Byjantaadmin

Jun 7, 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलसाठी तिसऱ्या मदत पॅकेजला मंजुरी देण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएनएलला सुमारे 89,047 कोटी रुपये मिळतील. या वृत्तानंतर सरकारी कंपनी आयटीआयचा शेअर 5 टक्क्यांनी वधारला आहे.बीएसएनएलला सरकारकडून एकूण 1.64 लाख कोटी रुपयांचे पॅकेज मिळालं आहे. कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारनं या पॅकेजची तीन भागांत विभागणी केली आहे. BSNL च्या 4G आणि 5G सेवांसाठी हे पॅकेज मंजूर झाल्याचं बोललं जात आहे.

bsnl revival plan 89 thousand crore 4g 5g service enhancing business news marathi BSNL Revival Plan: केंद्रीय मंत्रिमंडळाकडून BSNLसाठी 89,000 कोटी रुपयांच्या पुनरुज्जीवन पॅकेजला मंजुरी

सरकारनं कंपनीला 700 मेगाहर्ट्झ बँडमध्ये स्पेक्ट्रमचे वाटप केलं आहे. या स्पेक्ट्रमची किंमत सुमारे 39,000 कोटी रुपये आहे. सेवांमध्ये सुधारणा, बॅलेंसशीट मजबूत करणं आणि फायबर नेटवर्कचा विस्तार यांचा कंपनीला देण्यात येणाऱ्या मदत पॅकेजमध्ये समावेश आहे. बीएसएनएलची 33 हजार कोटी रुपयांची थकबाकी इक्विटीमध्ये रूपांतरित करण्यात आली आहे. यासह, कंपनीनं त्याच रकमेच्या (33,000 कोटी रुपये) बँकेच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी बाँड जारी केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलसाठी तिसऱ्या मदत पॅकेजला मंजुरी देण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएनएलला सुमारे 89,047 कोटी रुपये मिळतील. या वृत्तानंतर सरकारी कंपनी आयटीआयचा शेअर 5 टक्क्यांनी वधारला आहे.बीएसएनएलला सरकारकडून एकूण 1.64 लाख कोटी रुपयांचे पॅकेज मिळालं आहे. कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारनं या पॅकेजची तीन भागांत विभागणी केली आहे. BSNL च्या 4G आणि 5G सेवांसाठी हे पॅकेज मंजूर झाल्याचं बोललं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *