हाराष्ट्रात सिंचनाच्या सोयी उपलब्ध असूनही, दुर्दैवाने शेतीमालाला भाव मिळत नाही. मात्र, तेलंगणासारख्या अवघ्या नऊ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या राज्यात शेतीला २४ तास वीज मोफत दिली जाते. कृषी विकासाचा तेलंगणा फॉर्म्यूला भारत राष्ट्र किसान समिती महाराष्ट्रात वापरणार आहे.
महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती भारत राष्ट्र समितीचे विदर्भ समन्वयक ज्ञानेश्वर वाकुडकर यांनी काल (ता. ५) भंडारा येथे दिली. यावेळी माजी आमदार तथा बीआरएसचे नेते चरण वाघमारे उपस्थित होते.वाकुडकर म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या ११ वर्षांमध्ये साठ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतीसाठी मोफत पाणी, शेतीमालाला भाव, दर्जेदार खते, पेरणीच्या वेळी खर्चासाठी मदत, शेतमालाच्या खरेदीची राज्य सरकारकडून हमी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव, शेतीच्या डिजिटल नोंदी, या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत.महाराष्ट्रात राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे या गोष्टी होत नाहीत. याउलट अवघ्या नऊ वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या तेलंगणाने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली जलऊर्जा, सौरऊर्जा, औष्णिक ऊर्जा या क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे. तेथे शेतीसाठी २४ तास मोफत वीज, शेतीमाल खरेदीसाठी सात हजार केंद्रे यासाठी तेलंगणा शासनाने पाच लाख कोटी रुपये खर्च केला आहे.
मेंढपाळांना मेंढ्या विकत घेण्यासाठी ७५ टक्के अनुदान दिले जाते. वृद्धांना दरमहा तीन हजार रुपये मदत, शेतकऱ्यांना दहा हजार रुपये अनुदान देण्यात येते. तेलंगणा मॉडेलचा महाराष्ट्रात प्रसार करण्यासाठी भारत राष्ट्र समिती सक्रिय झाली असून, भंडारा जिल्ह्यातही पक्षाचे काम सुरू झाले असून, विकासाचे तेलंगणा मॉडेल घराघरांत पोहोचवले जाणार आहे.
पक्षाकडे आतापर्यंत दोन लाख ३० हजार सभासदांची नोंदणी झाली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभाELECTIONS पक्ष पूर्ण ताकदीने उतरणार आहे. कोणाशीही युती केली जाणार नाही. FARMERS प्रश्न आणि सर्वसामान्य मतदारांना बरोबर घेऊन MAHARASHTRA सत्ता परिवर्तनाचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे वाकुडकर यांनी सांगितले.