माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहरातील दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून दिल्या शुभेच्छा
लातूर प्रतिनिधी : मंगळवार ६ जून २०२३ :राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज मंगळवार दि. ६ जून रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरातील महात्मा बसवेश्वर चौक येथील देवयानी मॅथ क्लासेसच्या वैष्णवी शिरसाट ९९ टक्के
गुण, ओंकार समुद्रे ९७ टक्के गुण, श्रद्धा नाईकवाडे ९६ टक्के गुण, कावेरी जाधव ९६ टक्के गुण, आदिनाथ पांचाळ ९५ टक्के गुण, आशुतोष गिरी ९६ टक्के गुण आदी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हा. चेअरमन समद पटेल, बाभळगावचे उपसरपंच गोविंद देशमुख, देवयानी मॅथ क्लासेसच्या संचालिका कृष्णाई कोळपे, दत्ता कोळपे आदीसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.