• Thu. May 1st, 2025

“…तर मी राजकारण सोडेन”, ‘त्या’ आरोपांवर अजित पवार संतापले

Byjantaadmin

Jun 6, 2023

शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांना आता अजित पवारांनी सणसणीत उत्तर दिलं आहे. आरोप सिद्ध केला तर मी राजकारण सोडेन असं अजित पवार म्हणाले आहेत, तसेच आरोप सिद्ध करू शकला नाहीत तर त्यांनी (कृपाल तुमाने) घरी बसावं असा टोलाही अजित पवारांनी लगावला.

AJit Pawar

नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार कृपाल तुमाने म्हणाले की, “अजित पवार यांनी ते अर्थमंत्री असताना किती खोके जमवले ते सांगावं. खोक्यांशिवाय अजित पवार काम करत नव्हते. झोपताना आणि सकाळी उठल्यावर खोके पाहणारे लोक खोक्यांवरच बोलतात, पैसे घेतल्याशिवाय दादा कामच करत नव्हते.

दरम्यान, आज AJIT PAWAR यांना एका पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी कृपाल तुमानेंच्या आरोपावर प्रतिक्रिया विचारली. त्यावर अजित पवार म्हणाले, तुमाने यांनी सांगावं किंवा महाराष्ट्रातल्या एका व्यक्तीने जरी सांगितलं तरी मी राजकारण सोडेन. यांनी सिद्ध करून दाखवावं. सिद्ध करून दाखवलं नाही तर खासदाराने उद्यापासून घरी बसायचं. पण हा असला आरोप माझ्यावर करायचा नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना विचारा माझी कामाची पद्धत कशी होती ते. उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला.

राज्य सरकारविरुद्ध लोकांमध्ये असलेली खदखद नक्की बाहेर येईल. गद्दारांना SHIVSENA धडा शिकवेलच. पण, पन्नास खोके एकदम ओके हे तुम्हालाही विसरायचे नाही,” असं अजित पवार शिंदे गटातील नेत्यांबद्दल बोलले होते. यावर उत्तर देताना शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी अजित पवारांवर आरोप केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *