• Thu. May 1st, 2025

“RSS च्या सर्व्हेने भाजपात खळबळ”, काँग्रेसने दावा केलेले ६ निवडणूक कल कोणते? वाचा…

Byjantaadmin

Jun 6, 2023

काँग्रेसला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे.या निकालानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार उत्साह पाहायला मिळत आहे.अशातच काँग्रेसने मध्य प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकींबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) उल्लेख करत मोठा दावा केला आहे.“आरएसएसच्या सर्व्हेने भाजपात खळबळ, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येत आहे”, असा मोठा दावा काँग्रेसने केला.हा दावा करताना काँग्रेसने ६ सर्व्हेंचा हवाला दिला आहे. हे सर्व्हे नेमके कोणते आणि त्यातील दावे काय याचा हा आढावा…

१. जानेवारी २०२३ – सोशल मीडियावर संघाचा एक सर्व्हे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यात भाजपाला १०३ जागा मिळून सत्तेबाहेर जावं लागत आहे.

२. फेब्रुवारी २०२३ – काँग्रेसचा एक अधिकृत सर्व्हे समोर आला. यात भाजपाला केवळ ९५ जागा मिळत आहेत.

३. मार्च २०२३ – गुप्तचर विभागाचा एक गुप्त सर्व्हे लिक झाला. त्यात भाजपाला ८० पेक्षा कमी जागा मिळताना दिसत आहे.

४. एप्रिल २०२३ – दैनिक भास्कर आणि ईएमएससह इतर अनेक वृत्तसमुहांचे सर्व्हे प्रशासनात व्हायरल झाले आहेत. यात भाजपाला केवळ ७० जागा मिळत आहेत.

५. मे २०२३ – ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक सर्व्हे झाला त्यात भाजपाला केवळ ६५ जागा मिळताना दिसत आहे.

६. जून २०२३ – नवभारत समाचारने एक सर्व्हे प्रकाशित केला. यात भाजपा सतेतेबाहेर जात असून केवळ ५५ जागा मिळत असल्याचं सांगण्यात आलं.

वरील सर्व सर्व्हेंमध्ये काँग्रेसच्या जागा वाढत असल्याचं आणि काँग्रेस जनतेचा आवाज म्हणून पुढे येत असल्याचं दिसत आहे – काँग्रेस

दुसरीकडे भाजपाची स्थिती वाईट होत आहे. यावरून हे स्पष्ट आहे की, यावेळी भाजपा ५० पेक्षा कमी जागांवर निवडून येईल – काँग्रेस

काँग्रेसने नेमकं काय म्हटलं? याचा आढावा खालीलप्रमाणे…

मध्य प्रदेशमध्ये यावर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीआधी अनेक सर्व्हे समोर आले आहेत – काँग्रेस

यात मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येत असल्याचं दिसत आहे. भाजपाला केवळ ५५ जागांवर समाधान मानावं लागणार आहे – काँग्रेस

काँग्रेसकडे २०१८ च्या १५ महिन्यांचा कार्यकाळाचा अनुभव आणि कमलनाथ यांच्यासारखा निर्विवाद व अनुभवी नेता आहे. हे मुद्दे घेऊन काँग्रेस जनतेसमोर जात आहे – काँग्रेस

भाजपाची १८ वर्षांची देणेदारी आणि अपूर्ण घोषणांमुळे जनतेत सरकारविरोधी मोठी लाट तयार झाली आहे – काँग्रेस

मागील पाच महिन्यात मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत सहा वेगवेगळे सर्व्हे झाले आहेत. सर्व सर्व्हेंमध्ये भाजपाच्या जागा सातत्याने कमी होताना दिसत आहे – काँग्रेस

इतकंच नाही, तर सर्व सर्व्हेंमध्ये भाजपाचा दारूण पराभव होत असल्याचं समोर येत आहे – काँग्रेस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *