• Thu. May 1st, 2025

छत्रपती शिवरायांना शिवराज्यभिषकदिनी  मानवंदना

Byjantaadmin

Jun 6, 2023
छत्रपती शिवरायांना शिवराज्यभिषकदिनी  मानवंदना .
लातुर/प्रतिनिधी छत्रपती शिवरायांच्या शिवराज्यभिषकदिनाचा 349 वा वर्धापनदिन छत्रपती शिवाजी महाराज चौक  लातूर येथे  उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिशबाजी.  ध्वजवंदन करून शिवरायांना धुमधडाक्यात  मानवंदना देण्यात आली यावेळी. डाॅ हर्षवर्धन राउत. संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक उमाकांत उफाडे.दिशा प्रतिष्ठानचे अभिजीत देशमुख. हंसराज जाधव. शिवकुमार जाधव संभाजी ब्रिगेड लातूर महानगर अध्यक्ष मिथुन दिवे.डि एस पाटील कामखेडकर.  अभिमन्यू जगदाळे. सचिन डोंगरे. धनंजय शेळके सर. आकाश सुर्यवंशी.सचिन सोळुंके  यांच्या सहित शेकडो.संभाजी ब्रिगेड आणि  मराठा क्रांती मोर्चा. पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत होते.
संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून महाराष्ट्रभर 350 तालुक्यात छत्रपती शिवरायांना मानवंदना देऊन शिवराज्यभिषक त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षे वर्षेभर विवीध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरे करण्यात येणार आहे याची सुरूवात आज संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *