• Thu. May 1st, 2025

AMBIS प्रणाली मुळे चालू वर्षात 12 गुन्ह्यांची उकल; पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात अंगुली मुद्रा शाखेची कामगिरी

Byjantaadmin

Jun 6, 2023
AMBIS प्रणाली मुळे चालू वर्षात 12 गुन्ह्यांची उकल; पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात अंगुली मुद्रा शाखेची कामगिरी
LATUR  याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, लातूर जिल्हा पोलीस दलामध्ये सन 2004 पासून अंगुली मुद्रा शाखेची स्थापना करण्यात आली होती तेव्हापासून परंपरागत पद्धतीने कागदावर आरोपींचे बोटाचे ठसे घेवून ते कागद सांभाळून ठेवण्याची पद्धत होती. कालांतराने यामध्ये आधुनिकीकरण होऊन Automated Multi-Modal Biometric Identification System (AMBIS) या संगणकीय प्रणाली उदयास आली.या प्रणालीच्या माध्यमातून चालू वर्षात लातूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या गंभीर गुन्ह्याचे तसेच मला विषयक घरफोडी, दरोड्यासारख्या 12 गुन्ह्यांची उकल करण्यात अंगुली मुद्रा शाखेला यश आले आहे.
एएमबीआयएस प्रणाली ही प्रगत तंत्रज्ञानावर आधारित असून पोलीस दलाने आधुनिकीकरणाची कास धरून केवळ बोटांचे ठसेच नाही तर तळवे, चेहरा व डोळे स्कॅन करुन ते डिजिटल पद्धतीने साठवून ठेवण्यास सुरवात केली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलीस घटकांकडून या यंत्रणेचा वापर होऊन गुन्ह्यांची झटपट उकल होऊन दोषसिद्धीच्या प्रमाणात वाढ होत आहे.मार्च 2021 मध्ये प्रथमतः सदर प्रणालीचे वापर करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्यातून प्रायोगिक तत्त्वावर राज्यातून लातूर जिल्ह्याची निवड करण्यात आली होती. त्यानंतर मे 2022 पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सदर प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
अशी आहे एएमबीआयएस प्रणाली
पूर्वी गुन्हेगारांच्या बोटांच्या ठशावरून आरोपीची ओळख पटवली जायची मात्र आता हाताचे तळवे, सीसीटीव्ही फुटेजमधील चेहरा व छायाचित्रावरुनही गुन्हेगारांची ओळख पटविण्यात येत आहे. या प्रणालीत आरोपींच्या अंगुली मुद्रा पत्रिका, तळहाताचे ठसे, चेहरा व डोळ्यांची बुबुळे हे डिजीटल स्वरुपात जतन करुन ते इतर छायाचित्रांशी जुळविण्याची क्षमता आहे.पोलीस ठाणे स्तरापर्यंत ‘एएमबीआयएस’ यंत्रणा राबविणारे महाराष्ट्र राज्य हे भारतातील पहिले राज्य आहे. या यंत्रणेअंतर्गत सुमारे 6.5 लाख अटक व शिक्षाप्राप्त आरोपीचा अभिलेख संगणकीकृत करण्यात आलेला आहे. एएमबीआयएस प्रणाली ही भविष्यात सीसीटीएनएस, प्रिझम, सीसीटीव्ही व राष्ट्रीय स्तरावरील एन.ए.एफ.आय.एस. (NAFIS) या प्रणालीशी जोडण्यात येणार आहे.
          जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व अंगुली मुद्रा केंद्र, येथे एएमबीआयएस प्रणालीचे हार्डवेअर व सॉफ्टवेअर देण्यात आले आहे.
पोलीस ठाण्यात अटक आरोपीच्या अंगुली मुद्रा पत्रिकेची ऑनलाइन नोंदणी करुन त्यांचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा पूर्व इतिहास तपासण्यासाठी व त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी या संगणकीय यंत्रणेचा उपयोग होत असून एएमबीआयएस प्रणालीतंर्गत देण्यात येणा-या पोर्टेबल एएमबीआयएस या यंत्रणेचा वापर करून गुन्ह्यांच्या घटनास्थळी मिळालेल्या चान्सप्रिटद्वारे गुन्हेगारांचा शोध घेणे काही मिनिटातच शक्य झाले आहे.त्यामुळे गुन्हे प्रकटीकरणाच्या प्रमाणात वाढ होवून जिल्ह्याच्या दोषसिध्दीच्या प्रमाणात वाढ होत आहे.एएमबीआयएस प्रणाली ही प्रगत तंत्रज्ञानावर आधारित असुन यंत्रणेची गती व अचुकता यामुळे तो इतर प्रणालीपासून वेगळी ठरली आहे. इंटरपोल आणि एफबीआय येथे हे तंत्रज्ञान वापरण्यात येते.जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी एएमबीआयएस यंत्रणा महत्वाची भूमिका पार पडणार आहे.लातूर जिल्ह्यात चालू असलेल्या एएमबीआयएस प्रणालीवर सन 2021 पासून आज पर्यंत 1128 इतक्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीवर पूर्वीपासून दाखल असलेल्या गुन्ह्याचा शोध घेण्यात आला असून जिल्ह्यातील विविध गुन्ह्यातील 14,124 आरोपीचे डाटा फीडिंग करण्यात आलेला आ सदर प्रणाली अंगुली मुद्रा शाखेतर्फे चालवली व नियंत्रित करण्यात येत असून यासाठी तांत्रिक माहिती असलेले एक सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी प्रभाकर माळवदकर व पाच पोलीस अमलदारांची नेमणूक करण्यात आली असून सदरचे पथक पोलीस अधीक्षक यांच्या नियंत्रणामध्ये काम करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *