महाराष्ट्र महाविद्यालयात एमसीए अभ्यासक्रमास मान्यता
(एआय टेक्नॉलॉजी व संगणक शास्त्राचे नवे दालन विद्यार्थ्यांसाठी खुले)
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून एमसीए (मास्टर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन) DTE code 02674 या पदयुत्तर अभ्यासक्रमाची अधिकृत मान्यता प्राप्त झालेली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व (AICTE) एआयसीटीई अंतर्गत मिळालेल्या या मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून नियमित वर्ग सुरू होणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ आता निलंग्यातील महाराष्ट्र महाविद्यालयात मिळणार आहे. महाविद्यालयात बीसीए विभाग २००७ पासून कार्यरत असून, विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मोठ्या शहरांकडे जावे लागत होते.महाराष्ट्र शिक्षण समितीने पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना निलंगा शहरातच सोय उपलब्ध करून दिल्यामुळे एआय टेक्नॉलॉजी, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी आणि आधुनिक संगणक तंत्रज्ञानाचे शिक्षण स्थानिक विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होणार आहे. हे नवे दालन खुले झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह असून, पालक व शिक्षक मंडळींनी याचे स्वागत केले आहे. महाराष्ट्र शिक्षण समितीचे हे पाऊल ग्रामीण भागातील आयटी शिक्षणात मैलाचा दगड ठरणार आहे. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री. विजय पाटील निलंगेकर, सचिव बब्रुवानजी सरतापे, औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत पौळ, माजी प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर गायकवाड, प्रा. रवींद्र मदरसे, श्री. सुहास माने यांनी केले आहे.
