3 लाख 12 हजार रुपयांची प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त. 01 व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
लातूर (मोईज सितारी):- या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण,यांचे मार्गदर्शनात अवैध धंद्यावर कठोर कारवाई साठी मोहीम जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना दिनांक 15/07/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी एक इसम प्रतिबंधित गुटखा,तंबाखू रूममध्ये साठवून ठेवल्याची माहिती मिळाली. सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे मार्गदर्शनात सदरचे पथक दिनांक 15/07/2025 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास लातूर शहरातील नाथ नगर,मळवटी रोड भागातील एका घरावर छापा मारून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला 03 लाख 12 हजार रुपयांची सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैधरित्या साठवणूक व विक्री केलेला इसम नामे
1) ईश्वर रमाकांत गुंडरे, राहणार शाहू चौक, लातूर (फरार)
याचे विरुद्ध पोलीस ठाणे विवेकानंद येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची चाहूल लागताच नमूद इसम हा पळून गेला असून पोलीस पथक त्याचा शोध घेत आहेत.गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार युवराज गिरी, प्रदीप स्वामी, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे यांनी केली आहे.
