केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी भेट घेतली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. या भेटीनंतर शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार या विषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, यावर भाष्य केले आहे. फडणवीस म्हणाले, ‘मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. विस्तार कधी होणार, याबाबत मुख्यमंत्री शिंदे सांगतील’.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार SANJAY RAUT यांच्या संदर्भातही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले, संजय राऊत यांच्यावर प्रतिक्रिया देणार नाही. आगामी निवडणुकीवर भाष्य करताना ते म्हणाले, ‘शिवसेना-भाजप सर्व निवडणुका एकत्र लढवण्यावर चर्चा झाली. तालुका-जिल्हा स्तरावर दोन्ही पक्षात समन्वय ठेवण्याचा निर्णय झाला. एकत्र निवडणूक लढण्यासाठी रणनीती आखायची जाणार आहे.नगरच्या एका कार्यक्रमात औरंगजेबाचे फोटो झळकवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावरुन फडणवीस म्हणाले, ‘औरंगजेबाजे फोटो कुणी झळकवत असेल तर ते मान्य केले जाणार नाही. आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आहेत. कुणी औरंग्याचे नाव घेत असेल तर माफी नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.