मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील कंत्राटदार माजल्यासारखे वागतात, अशी संतप्त प्रतिक्रीया काँग्रेस’च्या आमदार आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली दिली आहे. यशोमती ठाकूर यांनी रविवारी सायंकाळी त्यांच्या मतदारसंघाची पाहणी केली.पावसाळा तोंडावर आलेला असतानाही रस्त्यांची कामे अर्धवट झाली आहे. पण कंत्राटदारांनी रस्त्याचे काम पूर्ण झाल्याच्या पाट्या लावल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी कंत्राटदाराची चांगलीच खरडपट्टी काढली. त्यांनी कंत्राटदाराला विचारलं की, हा बोर्ड कशासाठी लावला आहे, त्यावर रस्त्यांच्या कामासाठी कोणकोणते मटेरियल लागणार हे या बोर्डावर लिहीलं असल्याचं त्याने सांगितलंं.
पावसाळा तोंडावर आलेला असतानाही तुम्ही जून रस्त्याचं काम पूर्ण केलं नाही. एक नाला बनवला तर दुसरा अद्याप बनवलेला नाही. पावसाळा सुरु झाला की, हा रस्ता पूर्ण बंद होऊन जातो. पाऊस सुरु झाला की गावात ये-जा करण्यासाठी रस्ताच राहत नाही, गावाशी संपर्क तुटतो. काय चाललंय तुमचं, असा प्रश्न कंत्राटदाराला केला. कंत्राटदारांने उत्तर देताना सांगितलं की, मधल्या काळात फंडची कमतरता होती. त्यामुळे काम थांबलं होतं. विभाग सांगेल तसे काम आम्हाला करावं लागतं. त्यानुसार आम्ही काम करतो. असे त्याने सांगितले. त्यावर, दोन वर्षभरापासून काम करु नका असं सरकारने तुम्हाला सांगितलं होतं. का, पावसाळ्याच्या आधी हे काम पूर्ण झालं नाही, तर काम कसं करणार तुम्ही, तसेच, नाल्याची रेती वापरू नका, चांगली क्वालीटीची कामं करा. पूर्ण झालं नाही तर याद राखा. असा इशाराच यशोमती ठाकून यांनी कंत्राटदाराला दिला आहे