• Wed. Apr 30th, 2025

नॅशनल उर्दू हायस्कूलच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम

Byjantaadmin

Jun 5, 2023
नॅशनल उर्दू हायस्कूलच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम
 (९१.४८ टक्के निकाल)
परभणी (प्रतिनिधी) येथील नॅशनल उर्दू हायस्कूलने मार्च २०२३ मध्ये विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवलीअसून विद्यालयाचा निकाल ९१.४८ टक्के लागला आहे.
यात शेख आवेस शेख अज़ीम ने ८६.२० टक्के गुण घेवून शाळेत सर्वप्रथम आला आहे .तर दुर्राणी नौरीन सदफ हामेद खान दुर्राणी ने ८४.४० टक्के गुण घेवून द्वितीय आणि निमरा सदफ खलीलोद्दीन इनामदार ने ८४.२० टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. व तसेच अंजुम राहीमीन शेर खान पठाण ८३.८०% , शेख शोएब शेख ग़ौसोद्दीन ८३.००% , शेख मुसद्दीक़  ८०.८०% तर सालेहा समर ने ७९. ४०टक्के गुण प्राप्त केले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव अलीशाह खान, संस्थाध्यक्ष इमरान खान, संस्थेच्या उपाध्यक्षा तथा मुख्याध्यापिका आयेशा कौसर खान यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *