चाफा, कनेरी, टीकोमा, स्वस्तिक, मधूकामीनी, जास्वंद, गुलाब, मोगरा, जेट्रोफा अशी ११०० फुलझाडे लावून जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला.
ग्रीन लातूर वृक्ष टीम; शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर याठिकाणी ही फुलझाडे लावून सुन्दर असा बगीचा तयार करण्यात आला आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रीन लातूर वृक्ष टीम सोबत, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चे प्राध्यापक, विद्यार्थी, जैन सोशल फाउंडेशन, रयत प्रतिष्ठान, संवेदना संस्था, समर्पण फाउंडेशन, रोटरी क्लब लातुर श्रेयस, लायन्स क्लब लातूर, नवजीवन लॅबोरेटरी, राजश्री शाहु महाविद्यालय, प्रा. सदाशिवजी शिंदे परिवार, महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा यांचे सदस्य व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.यावेळी इको ब्रिक्स बाटल्यां बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. दुधाच्या पिशव्या द्या झाडांची रोपे घेऊन जा या उपक्रमाअंतर्गत दुधाच्या पिशव्या आंनणार्याचा सत्कार करण्यात आला.राजश्री शाहू महाविद्यालयचे प्राचार्य महादेव गव्हाणे यांनी उपस्थित सर्वाना पर्यावरण रक्षण करण्याचे, जास्तीत जास्त झाडे लावून संगोपन करण्याचे आवाहन केले.