ओडिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातात २८८ नागरिकांचा मृत्यू झाला असून तब्बल ९०० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या दुर्घटणेचे खरे कारण पुढे आले आहे.
बालासोर : शुक्रवारी संध्याकाळी उशिरा कोरोमंडल एक्सप्रेस आणि बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस यांच्यात भीषण टक्कर झाली. या अपघातात आतापर्यंत २३३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ९०० हून अधिक लोक जखमी झाले आहे. कोरोमंडल एक्सप्रेस पश्चिम बंगालमधील शालीमार स्टेशन आणि चेन्नई दरम्यान धावते. यशवंतपूरहून येणाऱ्या दुसऱ्या पॅसेंजर ट्रेनला त्याची धडक बसली. त्याचे अनेक डबे रुळावरून घसरले. यानंतर समोरून येणाऱ्या मालगाडीलाही धडक दिली. दरम्यान, या भीषण आपघटचे खरे कारण पुढे आले आहे. रेल्वेमंत्र्यांनी या बाबत माहिती दिली आहे.
ओडिशाच्या बालासोर इथे शुक्रवारी रेल्वेचा भीषण अपघात झाला. गेल्या १५ वर्षातील हा सर्वात मोठा रेल्वे अपघात होता. शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस आणि बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने आणि मालगाडीला धडकल्याने हा अपघात झाला होता. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातस्थळी भेट देऊन मृत कुटुंबियांप्रती सांत्वना व्यक्त केली. आज सकाळी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बालासोर रेल्वे अपघातस्थळी पोहोचून सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. यावेळी रेल्वेमंत्र्यांनी काल पंतप्रधानांनी दिलेल्या निर्देशानुसार काम वेगाने सुरू असल्याचे सांगितले.
दरम्यान, काल हा मार्ग पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. शनिवारी रात्री एका ट्रॅकचे काम पूर्ण झाले.तर दुसरा ट्रॅक पूर्णपणे दुरुस्त करण्यासाठी आज काम सुरू आहे. बुधवारी सकाळपर्यंत सामान्य मार्ग सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न आहे. आज सकाळी या कामाची पाहणी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. त्यांनी पत्रकारांशी बोलतांना या अपघाताबाबत माहिती दिली. प्राथमिक तपास अहवाल प्राप्त झाला आहे. एवढा भीषण अपघात कसा घडला याचीही माहिती समोर आली आहे.सिग्नलमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला. सिग्नलमुळे कोरोमंडल एक्सप्रेस एका बाजूच्या ट्रॅकमध्ये शिरली, ज्याला लूप लाइन म्हणतात. त्यावर काही मीटर पुढे एक मालगाडी उभी होती. वरिष्ठ रेल्वे अधिकार्यांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, दोन गाड्या ज्या मार्गावर आदळल्या तो ट्रॅक मोठ्या प्रमाणात गंजलेला होता. त्यामुळे हा भीषण अपघात झाला.रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये, गंभीर जखमींना २ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. जखमी प्रवाशांना बालासोर मेडिकल कॉलेज, सोरो आणि गोपाळपूर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. खाटापाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे