Latur सोळा वर्षांच्या सृष्टी जगतापने (Srushti Jagtap) आज जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. सलग 126 तासापेक्षा अधिक नृत्य करत तिने इतिहास रचला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. लातूर येथील दयानंद सभागृहात 29 तारखे पासून सृष्टी जगतापने नृत्य करण्यास सुरुवात केली आहे. पाच दिवस पाच रात्र तिने सलग नृत्य केले आहे. पहिल्या दिवसापासूनच लातूरकरांनी सतत या सभागृहात येत सृष्टी जगतापला पाठींबा दिला आहे. सृष्टीने यापूर्वीही 24 तास सलग नृत्य करत आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्वत:च्या नावाची नोंद केली आहे. यातूनच प्रेरणा घेत तिने जागतिक विक्रम करण्याची भूमिका घेतली. त्यासाठी मागील काही वर्षांपासून तिने तयारी सुरू केली होती. सृष्टी जगतापचा विक्रम पूर्ण होत असताना लातूरकरांनी दयानंद सभागृहात मोठी गर्दी केली होती. महिला आणि तरुण मुलीची संख्या लक्षणीय होती.
सगळ्यात मोठा नृत्य मॅरेथॉन
आज पर्यंतचे नृत्याचे सर्व जागतिक विक्रम हे आशियातील आहेत.सृष्टीच्या अगोदर हा विक्रम केरळ येथील हेमलता यांच्या नावावर होता. तो 123 तासाचा होता. त्यानंतर नेपाळ मधील बंदना नावाच्या मुलीने 2018 मध्ये 123 तासापेक्षा काही अधिक काळ नृत्य करत हा विक्रम मोडला होता . आता सृष्टीने तब्बल 126 तास सलग नृत्य करत जागतिक विक्रमाची नोंद केली आहे.
अनेक पथ्य पाळत केला विक्रम
सलग 126 तास नृत्य करताना सृष्टीला अनेक पथ्य पाळावे लागले आहेत. आहार, निद्रा आणि दिनक्रम याचा ताळमेळ घालावा लागला आहे. सलग नृत्य करताना काही काळ ब्रेक मिळतो तो नाममात्र असतो. त्याचवेळी भाकरी वरन असा हलका आहार. सतत पाणी फळांच्या रसाचे सेवन करणे. झोपेवर नियंत्रण मिळविण्यासाठी सतत क्रियाशील राहणे आवश्यक होते. यासाठी तिचे आजोबा आई-वडील आणि मित्रपरिवार तिला साथ देत होते.
लातूरच्या सृष्टी जगतापने जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. 126 तास सलग नृत्य सादर करत तिने जागतिक विक्ररम रचला आहे. 29 तारखेपासून तिने नृत्य सादर करायला सुरुवात केली होती. दरम्यान मोठ्या संख्येने हजेरी लावत लातूरकरांनी तिला साथ दिली आहे. सृष्टीचे नृत्य सादरीकरणाचे (Dance) व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत.