ओडिशामधील (Odisha) बालासोरमध्ये शुक्रवारी 2 जून रोजी भीषण ओडिशामधील अपघाताला झाला. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला तर 900 पेक्षा अधिक लोकं जखमी झाले आहेत. या अपघाताची तीव्रता इतकी गंभीर आहे की भारतीय रेल्वेच्या इतिहासातला हा सर्वात मोठा अपघात मानला जात आहे. घटनास्थळी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पाहणी केली. तसेच अपघातग्रस्त लोकांना मदत देखील जाहीर करण्यात आली आहे. पंरतु काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी रेल्वेमंत्र्यांवर आरोप करत काही सवाल उपस्थित केले आहेत. प्रियांका गांधी यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘ओडिशामधील अपघाताला आता 24 तासांपेक्षा अधिक काळ झाला आहे. नैतिक आधारांवर उच्चपदांवर बसलेल्या लोकांना त्यांच्या जबाबदारीचा जाणीव आता करुन द्यायला हवी का?’
‘तज्ज्ञ, संसदीय समिती, कॅग अहवालाकडे दुर्लक्ष करण्यासाठी कोणाला जबाबदार ठरवायचे?’ असा सवाल देखील प्रियांका गांधी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये विचारला आहे. ‘रेल्वेमधील रिकाम्या जागा आणि महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये निधीची जी कमतरता भासत आहे यासाठी कोणाला जबाबदार धरायचे? लाल बहादूर शास्त्री,नितीश कुमार, माधवराव सिंधिया यांनी देखील नैतिकतेचे पालन करुन रेल्वेमंत्र्यांनी आपला राजीनामा द्यायला नको का?’ असा सवाल करत प्रियांका गांधींनी रेल्वेमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.
रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
‘ओडिशामधील बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताची चौकशी करण्यसाठी समिती गठित करण्यात आली असून लवकरच अहवाल सादर करण्यात येईल’, असा दावा रेल्वेमंत्र्यांनी केला आहे.या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांवर उपचार देखील करण्यात येत आहेत. रेल्वेरुळ पूर्ववत करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे.यादरम्यान विरोधी पक्षांकडून रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे.
बालासोर, उड़ीसा में भयावह ट्रेन दुर्घटना को हुए 24 घंटे से अधिक बीत चुके हैं
क्या मानवीय व नैतिक आधार पर शीर्ष पदों पर बैठे लोगों की जवाबदेही नहीं तय की जानी चाहिए?
विशेषज्ञों, संसदीय समिति, CAG रिपोर्ट की चेतावनियों व सुझावों को नजरंदाज करने के लिए कौन जिम्मेदार है?
रेलवे में…
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) June 4, 2023
अपघातावर रेल्वेमंत्र्यांची प्रतिक्रिया
इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव या घटनेला 39 तास पूर्ण झाल्यानंतर सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं की, ‘रेल्वेचे सुरक्षा आयुक्त यासंदर्भात योग्य ती चौकशी करत आहेत. त्यामुळे माझ्याकडून यासंदर्भात कोणतीही टीप्पणी करणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे त्यांच्याकडून अहवाल आल्यावर या अपघाताचे मूळ कारण समजेल.’