तेलुगु देसम पक्षाचे (TDP) अध्यक्ष, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीमुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याचे दिसते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजपला दक्षिणेचं व्दार खुले होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अमित शाह आणि नायडू यांच्यामध्ये तासभर बैठक झाली. यात अनेक मुद्यांवर चर्चा झाली. पण या दोन्ही नेत्यांमध्ये युती होणार की नाही बाबत निर्णय अद्याप गुलदस्तात आहे. एनडीएमधून बाहेर पडणारा चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी हा पहिला पक्ष होता. आता BJP आणि टीपीडी पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत आहे, असे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.दोन महिन्यापूर्वी चंद्राबाबू नायडू यांनी मोदी सरकारचे कौतुक केले होते. देशाला विकासाच्या चालना देण्यासाठी मोदींना पाठिंबा देण्यासाठी आम्ही तयार आहे, असे नायडू म्हणाले.”२०१८ मध्ये टीडीएसने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरुन एनडीए संपुष्टात आले होते. अर्थंसंकल्पात निधी देण्यासंदर्भात आंध्रप्रदेशाकडे दुर्लक्ष केले जाते, त्यामुळे आम्हीNDAमधून बाहेर पडलो,” असे चंद्राबाबू नायडू यांनी स्पष्ट केले.अमित शाह आणि चंद्राबाबू नायडू यांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा टीडीपी आणि बीजीपी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे भाजपसाठी ही मोठी आनंदाची बाब असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे A P आणि दक्षिण भारतात भाजपला मजबूत करण्यासाठी हे मोठं पाऊल असल्याचे समजले जाते.