ओडिशा रेल्वे अपघातात 288 प्रवासी ठार आणि एक हजारापेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले. रेल्वे अपघात इतिहासातील हा सर्वात भीषण अपघात आहे. या भीषण रेल्वे अपघातावर आता काँग्रेसने (Congress News) भाजपवर (BJP) प्रश्नांचा भडीमार केला आहे.काँग्रेस अध्यक्ष खर्गे म्हणाले की, “स्वतंत्र भारतातील सर्वात वेदनादायक रेल्वे अपघातावर सरकारला आमचे काही प्रश्न आहेत. जाहिरातींच्या नाटकांनी सरकारी यंत्रणा पोकळ बनवली आहे. रेल्वेत 3 लाख पदे रिक्त आहेत, वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदेही रिक्त आहेत, मागील 9 वर्षांत का ही भरती का गेली नाही,” असा सवाल खर्गे यांनी विचारला.
काँग्रेस नेते पवन खेडा म्हणाले की, “10-12 चकचकीत गाड्या दाखवण्याच्या प्रक्रियेत रेल्वेची संपूर्ण रचनाच ढासळली आहे. राजीनामे म्हणजे नैतिक जबाबदारी घेणे, मात्र येथे नैतिकता उरलीच नाही, तर राजीनामा कोणाकडे मागायचा? असेही पवनखेडा म्हणाले. कॅगच्या अहवालात असे दिसून आले आहे की, ट्रॅकच्या देखभालीसाठीचे बजेट सातत्याने कमी होत आहे. रेल्वेच्या अहवालानुसार ३ लाख १२ हजार पदे रिक्त आहेत. जीव गेला पण जनसंपर्क झाला नाही तर सरकारला हे धोरण सोडावे लागेल. ते रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा देणार का? कॅग आणि स्थायीच्या अहवालाची दखल घेणार? या तीन प्रश्नांची उत्तरे आपल्याला हवी आहेत, असे काँग्रेसने म्हंटले आहे.
जुनी व्यवस्था पूर्ववत झाली पाहिजे – काँग्रेस
या दुरुस्तीच्या कामाचे, सुरक्षेचे परिणाम RAILWAY कळवण्यात आले आहेत. ही दुरुस्ती सुरक्षेच्या हिताची नाही आणि सोयीपेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य दिले पाहिजे, असे आयोगाचे अजूनही मत आहे. त्यामुळे जुनी पूर्वीची व्यवस्था तशीच राखावी. पर्यायी व्यवस्था करून सुविधा देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. तात्काळ पर्यायी व्यवस्था करावी, जे लोक रेल्वेने जाणार नाहीत, त्यांची व्यवस्था करावी, अशीही आमची मागणी आहे, असे CONGRESS म्हंटले आहे.