• Wed. Apr 30th, 2025

एकेकाळच्या ‘या’ बालेकिल्ल्यावर कॉंग्रेस करणार दावा !

Byjantaadmin

Jun 4, 2023

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी कॉंग्रेसने मुंबईतील टिळक भवनमध्ये नुकत्याच दोन दिवस बैठका घेतला. त्यानंतर मतदारसंघांवर दावे ठोकण्याला सुरुवात झाली आहे. अंतिम निर्णय महाविकास आघाडीची बैठक झाल्यावरच होणार आहे. महाविकास आघाडीत कार्यकर्त्यांची मर्जी राखण्याची कसरत तिन्ही पक्षांना करावी लागणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीला वर्षभर वेळ असताना नुकतीच काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघावर दावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी ज्येष्ठाला संधी न देता पक्षाने तरुण कार्यकर्त्याला संधी द्यावी, अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची बैठक मुंबई येथील टिळक भवनात पार पडली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण व अशोकराव चव्हाण यांच्यासह बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, प्रा. वसंतराव पुरके, संध्या सव्वालाखे, देवानंद पवार, सचिन नाईक, संजय ठाकरे, प्रवीण देशमुख, अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर, दिलीपराव सरनाईक, दिलीप भोजराज, रामभाऊ बुरुगले, अशोकराव बोबडे, अरुण राऊत, भगवान पंडागळे, किरण कुमरे हेसुद्धा बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत महाविकास आघाडीकडे यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाची मागणी काँग्रेसने करावी, तसेच काँग्रेस या मतदारसंघातून लढल्यास विजय निश्‍चित मिळेल, असा आशावादही कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला. एकूणच या मतदारसंघातील आढावा घेण्यात आला असून उमेदवाराचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे.एकेकाळी यवतमाळ लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. खासदार उत्तमराव पाटील यांनी या मतदारसंघाचे दीर्घकाळ नेतृत्व केले. त्यानंतर शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व गेल्या २५ वर्षांपासून करीत आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यापासून मतदारसंघातील poltical समीकरणे बदलत गेली आहेत. खासदार गवळी यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोडून शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना-शिंदे गटात) प्रवेश केला. त्यातचBJP आपला उमेदवार देता येईल का, यासाठी चाचपणी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत आपल्याला येथे भरपूर वाव आहे, असे जिल्ह्यातील नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे मत आहे. त्यामुळे  MVA यवतमाळ लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed