एसटी बसची विश्वासार्हता प्रवाशामध्ये आजही कायम : प्राचार्य डाॕ. माधव कोलपूके
निलंगा (प्रतिनीधी) :-सर्वसामान्याची जिवन वाहीनी समजली जाणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसच्या अमृत मोहत्सव साजरा होत असून प्रवाशामध्ये आजही त्यांची सुरक्षितरित्या सेवेची विश्वासार्हता आजही कायम आहे. प्रवाशांनी चालक-वाहकासोबतचे सौहर्दपूर्व संवाद ठेवावा असे अवाहन महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. माधव कोलपूके यांनी केले.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिन निलंगा आगारात शनिवारी ता. तीन रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक अनिल राजेंद्र बिडवे, शिवसेना ठाकरे गट माजी तालुका प्रमुख ईश्वर पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष राम काळगे, पत्रकार माधव पिटले, वाहतूक निरीक्षक अशोक पवार, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक म. गो. कोळी , आगार लेखाकार संतोष बिडवे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री. आण्णासाहेब जाधव, सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री. व्ही. एन. चौधरी, वाहतूक नियंत्रक किशन कांबळे, वाहतूक नियंत्रक सत्यवान साळूंके, वाहतुक नियंत्रक यशवंत सूर्यवंशी, वरिष्ठ लिपिक श्री. राम सूर्यवंशी, वाहक श्री विनोद साळुंके, यांत्रिक विभागाचे समयोद्दीन काद्री व इतर यांत्रिक कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी श्री. कोलपूके म्हणाले की, ग्रामीण भागातून शहरी भागात मोठ्या प्रमाणात दळणवळणाची सुविधा एसटी मार्फत होते. गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी प्रवाशाचा विश्वास संपादन केला आहे. आजही लोक बस बंद झाली की, त्यांची चर्चा मोठ्या प्रमाणात होते. ग्रामीण भागातील विध्यार्थांच्या शिक्षणाची सोय या वाहतुकीमुळे झाली आहे. असे सांगून प्रत्येक प्रवाशांना सोबत घेऊन वेळेवर पोंहचण्याचे काम चालक-वाहक करत असतात त्यासाठी प्रवाशांनी अडचणी समजून घ्याव्यात असे अवाहन केले. तर आगार प्रमुख राजेंद्र बिडवे यांनी सर्व सुविधा प्रवाशांना देण्यासाठी महामंडळ सक्षम असल्याचे सां,गून परिवहन महामंडळाच्या वतीने अत्यावश्यक सेवा देण्याचे काम 75 वर्ष अखंडपणे सुरू असून या सेवेचा फायदा तळागाळातील सर्वाना झाला असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक पवार अशोक यांनी केले व तुकाराम चौधरी यांनी आभार मानले. या वेळी बस स्थानकातील उपस्थित प्रवाशांना पुष्पगुच्छ व पेढे देऊन वर्धापनदिन साजरा करण्यात आला तर मान्यवरांच्या हस्ते यावेळी पाणपोईचे उद्घाटनही करण्यात आले.