गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड मध्ये नोंद झालेल्या नृत्यांगना कु.सृष्टी जगताप यांचे लातूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीकडून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा
लातूर प्रतिनिधी –लातूरची कन्या कु.सृष्टी सुधीर जगताप यांनी सलग १२७ तास नृत्याविष्कार सादर करुन विश्वविक्रम केला आहे. कु. सृष्टी जगताप ची गिनीज बुक ऑफ
वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. ही सर्वच लातूरकरांसाठी गौरवाची बाब असून कु.सृष्टी जगताप यांचा सर्वांना अभिमान आहे. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण ,सांस्कृतिक कार्यमंत्री तथा माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या वतीने लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष ॲड.किरण जाधव तसेच विलास सहकारी बँकेचे उपाध्यक्ष ॲड.समद पटेल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह दयानंद महाविद्यालय सभागृहात जाऊन कु. सृष्टी जगताप यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आणि पुढील
वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रवीण सूर्यवंशी, ॲड.देविदास बोरूळे पाटील, सुपर्ण जगताप, प्रा.प्रवीण कांबळे, जालिंदर बरडे, प्रा.एम.पी.देशमुख, अभिजित इगे, अभिषेक पतंगे, अकबर माडजे, बालाजी झिपरे, अभिषेक पतंगे, विष्णुदास धायगुडे, अब्दुल्ला शेख, गोविंद केंद्रे, अमोल गायकवाड यांच्यासह लातूर शहर जिल्हा कॉंग्रेसचे पदाधिकारी, सदस्य आदी मान्यवर उपस्तिथ होते.