शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील नेत्यासंदर्भात खळबळजनक दावा केला आहे. शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात असून ते स्वगृही येण्याच्या तयारीत आहेत, परंतु त्यांना पुन्हा शिवसेनेत स्थान द्यायचे की नाही, याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील,” असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. यामुळे आता ते आमदार कोण याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
“शिंदे गटातीलच एक गट म्हणतोय की, एक वेळ हात झटकू पण, सन्मानपूर्वक यातून बाहेर पडू. दोन-चार नेते मोतोश्रीच्या संपर्कात आहेत. मुंबईतील शिंदे गटातील दोन आमदार आहेत. तसेच, मुंबईबाहेरील दोन आमदार आमच्या संपर्कात आहेत. य़ा चार आमदारांचं म्हणणं आहे की, आम्ही काही वक्तव्य केली नाहीत पण अडचणी होत्या. मात्र यांनी संधी द्यायची की नाही ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील.
शिंदे गटाचे खासदार कीर्तीकरांचं वक्तव्य :
शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर(Gajanan Kirtikar) यांनी मोठं विधान केलं आहे. कीर्तीकर म्हणाले, “आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो आहोत. त्यामुळे आमची शिवसेना एनडीएचा एक प्रमुख घटक पक्ष आहे. म्हणून आमची पण कामं झाली पाहिजे. आम्हांला देखील एनडीएचा घटक पक्ष म्हणून दर्जा मिळाला पाहिजे. असं असताना भाजपकडून शिवसेनेला सापत्न वागणूक दिली जात आहे अशी खदखद कीर्तीकर यांनी बोलून दाखवली होती, मात्र यानंतर त्यांनी आपल्यावक्तव्यावरून घुमजाव केले होते.
यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे १३ ते १४ आमदार शिंदेंच्या गटात येणार असल्याचा दावा मंत्री UDAY SAMAT यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. ‘कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भातले १३ ते १४ आमदार आमच्या पक्षात प्रवेश करणार एवढं नक्की, असा मोठा दावा सामंत यांनी केला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार VINAYAK RAUT यांनीही शिंदे गटातील खासदार व आमदार त्यांच्या पक्षात नाराज आहेत, ते लवकरच पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, असा दावा केला होता.
यामुळे आताSHIVSENA ठाकरे व शिंदे गटातील नेते एकमेकांच्या संपर्कात असल्याचा दावा दोन्ही नेत्यांकडून केला जात आहे. यामुळे आगामी काळात कोणते आमदार व खासदार कोणत्या गटात जाणार आहेत, याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे.