राज्य सरकारने शुक्रवारी (ता. २ जून) राज्यातील २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. याबाबतचे परिपत्रक सरकारकडून जारी करण्यात आले आहे. या बदल्यांमध्ये तुकाराम मुंढे यांचाही समावेश आहे. आता मुंढे यांच्याकडे मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात आयएसएसTUKARAM MUNDE यांची कृषी आणि पशुसंवर्धन विभागात अतिरिक्त सचिव म्हणून बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांची बदली करण्यात आली आहे. आतापर्यंत त्यांच्या प्रशासकीय सेवेच्या १८ वर्षांत २१ वेळा बदल्या करण्यात आल्या आहेत.
राज्यात M V A काळात मुंडे यांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आले होते. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर मुंडे यांना आरोग्य विभागातील महत्वाचे पद दिले होते. यावेळी काम करताना त्यांनी स्वत:च्या कामाच्या पद्धतीत काहीसा बदल केला. त्यानंतर त्यांची नोव्हेंबर २०२२ मध्ये मुंडे यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर त्यांना काही महिने ‘पोस्टिंग’ देण्यात आली नव्हती. दरम्यान, मे २०२३ मध्ये कृषी आणि पशुसंवर्धन विभागात अतिरिक्त सचिवपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर आता २ जून २०२३ रोजी पुन्हा बदली करण्यात आली आहे.तुकाराम मुंडे सनदी अधिकारी झाल्यापासून एका पदावर जास्त काळ राहिले नाहीत. त्यांच्या प्रशासकीय सेवेच्या १८ वर्षांच्या कार्यकाळात तब्बल २१ वेळा बदल्या झाल्या आहेत. मुंडे यांची २००५ मध्ये सोलापूर येथे उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेथे त्यांनी धडाकेबाज काम केले. त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या वारंवार बदल्या होत राहिल्या. त्यांच्या प्रशासकीय सेवेच्या कार्यकार्यकाळाची थोडक्यात माहिती..
आयएएस तुकाराम मुंढे यांच्या आत्तापर्यंत झालेल्या बदल्या
ऑगस्ट २००५ – प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर.
सप्टेंबर २००७ – उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग.
जानेवारी २००८ – सीईओ, जिल्हा परिषद नागपूर.
मार्च २००९ – आयुक्त, आदिवासी विभाग.
जुलै २००९ – सीईओ, वाशिम.
जून २०१० – सीईओ, कल्याण.
जून २०११ – जिल्हाधिकारी, जालना.
सप्टेंबर २०१२ – विक्रीकर सहआयुक्त मुंबई.
नोव्हेंबर २०१४ – सोलापूर जिल्हाधिकारी.
मे २०१६ – आयुक्त, नवी मुंबई महापालिका.
मार्च २०१७ – मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे.
फेब्रुवारी २०१८ – आयुक्त, नाशिक महापालिका.
नोव्हेंबर २०१८ – सहसचिव, नियोजन.
डिसेंबर २०१८ – प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई.
जानेवारी २०२० – आयुक्त, नागपूर महापालिका.
ऑगस्ट २०२० – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.
जानेवारी २०२१ – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत.
सप्टेंबर २०२२ – आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान.
२९ नोव्हेंबर २०२२ – नियुक्तीच्या प्रतीक्षेत
एप्रिल २०२३ – सचिव पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
२ जून २०२३ – सचिव मराठी भाषा विभाग