नाशिक महापालिकेच्या शिक्षणअधिकारी (NMC education Officer) सुनिता धनगर (Sunita dhangar) यांच्यासह लिपिकाला ५५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे.याप्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. सुनिता धनगर यांच्याकडे मोठं घबाड सापडल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सुनिता धनगर यांच्या लाचखोरीमुळे महापालिकेच्या शिक्षण विभागातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे.
दोन्ही लाचखोरांवर सरकारवाडा पोलिसामध्ये शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. नितीन जोशी असे दुसऱ्या लाचखोराचे नाव आहे. नितीन जोशी यांनी पत्र बनवण्याचे मोबदल्यात पाच हजार रुपयाची लाच मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारली.यात अजून कोण सहभागी आहेत, याबाबत चर्चा सुरु आहे.तक्रारदार मुख्याध्यापकास शैक्षणिक संस्थेने रुजू करून घेण्यासाठीचे पत्र त्या संस्थेला देण्याच्या मोबदल्यात ही लाच घेतल्याची माहिती समोर आली आहे.तक्रारदार हे एका शैक्षणिक संस्थेमध्ये मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांना सदरील संस्थेने बडतर्फ केले आहे. त्याकामी त्यांनी शैक्षणिक न्यायाधिकरणNASHIK येथे दाद मागितल्याने त्यांच्यावरील बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यात आली होती.तक्रारदार यांनी मनपा शिक्षणाधिकारीसुनीता धनगर यांच्याकडे संबधीत संस्थेवर कारवाई करण्यासाठी अर्ज केला होता. त्याकरिता यातील सुनिता धनगर यांनी सदरबाबत पत्र देण्यासाठी 50 हजार रुपयाची लाच मागणी केली.आज (शनिवारी) POLICE अधिक तपास करण्यास सुरवात केली आहे. धनगर यांचे घर इतर मालमत्तेची झाडाझडती घेण्याचे काम सुरु आहे. यात मोठे घबाड हाती लागले असल्याची माहिती आहे.