• Wed. Apr 30th, 2025

बसचा भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली एसटी बस पलटी

Byjantaadmin

Jun 3, 2023

OSMANABAD मधून मोठी बातमी समोर येत आहे. परंडा बस डेपोची बस पलटी झाली आहे. या भीषण अपघातामध्ये 26 जण जखमी झाले आहेत. चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीनं जखमींना उपचारासाठी परांडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर चालक गंभीर जखमी असल्यानं त्याला बार्शी येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. चालकाचा बसवरील ताब सुटल्यानं हा अपघात झाला आहे.

धाराशिवमध्ये बसचा भीषण अपघात

ताबा सुटल्यानं बसचा अपघात   

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, परंडा डेपोची ही बस परंडामधून धाराशिवला येत होती. मात्र ही बस सोनगिरी चाकूला परिसरात आली असता, कंटेनरच्या मागून एक वाहन पुढे आले. वाहन अचानक समोर आल्यानं चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि ही बस पलटी झाली. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये.मिळत असलेल्या माहिती प्रमाणे या अपघातामध्ये एकूण 26 प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं परंडा येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तर या घटनेत चालक गंभीर जखमी झाला असून, चालकाला बार्शी येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed