मुंबई, 3 जून : भाजपकडून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. आता सोशल मीडियावर पकड असलेले इन्फ्लुन्सरही प्रचाराच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय भाजपनं घेतला आहे. सोशल मीडियावरील लढाईसाठी सज्ज व्हा. 2024 च्या तयारीला लागा असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया इन्फ्लुन्सरला दिले आहेत. गरवारे क्लबमध्ये भाजप नेते आणि 300 हून अधिक सोशल मीडिया इन्फ्लुन्सरची बैठक पार पडली. या बैठकीत फडणवीस बोलत होते.
सोशल मीडियाचा प्रभावी वापर
भाजपकडून आतापर्यंत निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे करण्यात आला आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये देखील भाजपकडून सोशल मीडियाचा वापर मोठ्याप्रमाणात केला जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर गरवारे क्लबमध्ये भाजप नेते आणि 300 हून अधिक सोशल मीडिया इन्फ्लुन्सरची बैठक पार पडली. या बैठकीत फडणवीस यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. सोशल मीडियावरील लढाईसाठी सज्ज व्हा. 2024 च्या तयारीला लागा असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया इन्फ्लुन्सरला दिले आहेत.
9 वर्षांतील कामगिरीवर प्रकाश
या बैठकीमध्ये युट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्वीटर व इतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी हजेरी लावली होती. मोदी सरकारच्या चांगल्या कामाचे व्हिडीओ तयार करावेत आणि ते सोशल मीडियावर जास्तीत जास्त प्रसारीत करण्याचे आदेश या सोशल मीडिया इन्फ्लुन्संना देण्यात आले आहेत. सरकारच्या गेल्या 9 वर्षांतील कामगिरीवर इन्फ्लुन्सर प्रकाश टाकणार आहेत.