• Wed. Apr 30th, 2025

राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, तुकाराम मुंडे यांची महिनाभरात पुन्हा बदली,पृथ्वीराज बी.पी. जिल्हाधिकारी, लातूर यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्ती

Byjantaadmin

Jun 3, 2023

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील २० प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. तुकाराम मुंढे यांची महिनाभरातच पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे मराठी भाषा विभाग सोपवण्यात आला आहे.

नाशिक महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आता साखर आयुक्त म्हणून नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. संजीव जयस्वाल यांची म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. मात्र, जयस्वाल यांच्याकडे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव पदाचा पदभार देखील कायम राहणार.

खालील २० प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या –

  • तुकाराम मुंढे यांची मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • सुजाता सौनिक, ACS (AR&OM), GAD, मंत्रालय, मुंबई यांची अतिरिक्त मुख्य सचिव (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्त करण्यात आली आहे.
  • एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही.आर. श्रीनिवास यांची धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक आयएएस अधिकारी लोकेश चंद्र यांची महावितरणच्या मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  •  राधिका रस्तोगी यांची नियोजन विभागात नियुक्ती करण्यात आली.
  • आय.ए. कुंदन यांची अल्पसंख्याक विकास विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.
  • संजीव जयस्वाल यांच्याकडे पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग कायम राहणार असून त्यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • आशीष शर्मा AMC, BMC, मुंबई यांना PS(2), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.
  • महावितरणचे मुख्य व्यवस्थापकीय संचलक विजय सिंघल यांची बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • अंशु सिन्हा CEO, M.S.खादी ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांची सचिव OBC बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
  • अनुप कृ. यादव सचिव, अल्पसंख्याक विभाग यांची महिला आणि बालकल्याण विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.
  • डॉ. अमित सैनी CEO, MMB, मुंबई यांची मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन नियुक्ती करण्यात आली आहे.
  • चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त नाशिक महापालिका यांची साखर आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • डॉ. माणिक गुरसाल अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग) यांची मेरिटाईम बोर्डचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • कादंबरी बलकवडे आयुक्त कोल्हापूर महापालिका यांची DG, MEDA, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • प्रदिपकुमार डांगे यांना संचालक, रेशीम, नागपूर या पदावर नियुक्त केले आहे.
  • शंतनू गोयल आयुक्त, MGNREGS, नागपूर यांची सिडको, नवी मुंबई सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • पृथ्वीराज बी.पी. जिल्हाधिकारी, लातूर यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • डॉ. हेमंत वसेकर यांची आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • डॉ. सुधाकर शिंदे यांची मुंबई महापालिकेत अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed