शिवाजीराव पाटील विद्यालय
अनसरवाडा येथील शाळेचा निकाल 95 टक्के
निलंगा:-शिवाजीराव पाटील विद्यालय अनसरवाडा येथील शाळेचा निकाल 95 टक्के लागला असून 78 पैकी 74 विद्यार्थी उत्तीर्ण झाले यात स्नेहा दाळिंबे या विद्यार्थिनी 92.20% घेऊन प्रथम क्रमांक पटकावला तर मानसी पाटील या विद्यार्थिनीने 92% घेऊन द्वितीय आली तर रोहिणी उसनाळे व प्रीती माने या विद्यार्थिनींनी 90% घेऊन तृतीय येण्याचा बहुमान मिळवला. एकूण निकालाच्या तुलनेत विशेष प्राविण्यसह 44, प्रथम श्रेणीत 16, द्वितीय श्रेणीत 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक टी. टी.माने, अजित माने, मुख्याध्यापक दत्ता शाहीर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले