• Tue. Apr 29th, 2025

उदगीरच्या शैक्षणीक वैभव जपणार्या ब्राईट स्टार हायस्कूलचे दहावी परिक्षेत घवघवीत यश

Byjantaadmin

Jun 2, 2023
उदगीरच्या शैक्षणीक वैभव जपणार्या ब्राईट स्टार हायस्कूलचे दहावी परिक्षेत घवघवीत यश-
कु.पुनम स्वामी व कु.इफ्रा शेख 100% गुण घेऊन प्रथम
उदगीर(प्रतिनिधी):-गुणवत्तापूर्ण शिक्षण व दहावी बोर्ड परिक्षेतील यशाची परंपरा कायम ठेवत शाळेचा निकाल प्रतीवर्षाप्रमाणे 100% लागला असून कु.पुनम स्वामी व कु.इफ्रा शेख 100% गुण घेऊन शाळेच्या उज्वल परंपरेत  मानाचा तुरा रोवला आहे,उदगीरच्या शैक्षणिक पटलावर ब्राईट स्टार हायस्कूलचे नाव सुवर्णाक्षरात रेखले आहे..मागीलवर्षीही ब्राईटस्टार हायस्कूलच्या कु.स्नेहल मुत्तेपवार व कु.सुप्रिया येलगुंदे यांनी 100% गुण प्राप्त करून जिल्हयात प्रथम स्थान मिळविले होते.सध्याच्या स्पर्धात्मक युगात,ब्राईट स्टार हायस्कूल समाजातील सर्व स्तरांतून सर्व परिपूर्ण,मेहनतीने यशवंत विद्यार्थी घडवित आहे. 95% पेक्षा जास्त गुण घेणारे 12 विद्यार्थी, 90% पेक्षा जास्त गुण घेणारे 17 विद्यार्थी , असा शाळेचा 100% निकाल लागला आहे
पुनम स्वामी 100%
शेख इफ्रा 100%
सय्यद जुनेद 99%
बिरादार शृष्टी 98%
देशमुख मयुरी 98%
जळकोटे शफिया 97%
बनबरे अमित 97%
विरकपाळे मनमथ 97%
स्वामी धिरज 96%
संकाये रोनीत 96%
बिरादार सहदेव 96%
शेख साद 96%
हरीओम सुर्यवंशी 94%
कांबळे तृप्ती 94%
गंदगे शिवम 94%
ईटगे हर्षल 92%
उतकर आदित्य 90%
गुंगे आदित्य 90%
तवंडे अर्पिता 90%. या सर्व विद्यार्थ्यांचे ,पालकांचे व शिक्षकांचे शाळेचे प्राचार्य विरभद्रजी घाळे, प्राचार्या सौ प्रेमा घाळे, डॉ भाग्यश्री घाळे, प्रा अजिंक्य घाळे,प्रा ऋतुजा घाळे यांनी अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed