उपप्राचार्य पदी डॉ.पद्माकर पिटले यांची नियक्ती
निलंगा, येथील रहिवाशी असलेले व श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथे कार्यरत असलेले मराठी विभाग प्रमुख प्रोफे.(डॉ) पद्माकर पिटले – जाजनुरकर यांची उपप्राचार्य पदी नियुक्ती केली आहे. प्रोफेसर डॉ.पद्माकर पिटले यांचे महाविद्यालयीन शिक्षण महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथे झाले असून पदव्युत्तर शिक्षण पुणे विद्यापीठ, पुणे येथून झाले आहे. विद्यार्थी दशेपासूनच छात्रभारती या विद्यार्थी संघटनेत त्यांनी कार्य केले असल्यामुळे एक शिक्षकप्रिय विद्यार्थी म्हणून ते सर्वपरिचित आहेत. एम. ए. मराठी विषयात त्यांनी पुणे विद्यापीठात दुसरा क्रमांक पटकाविला असून सेट, नेट सारख्या कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षा ते पहिल्या प्रयत्नात पास झाले आहेत. एक संवेदनशील कवी, मराठी भाषेचा संशोधक, अभ्यासक म्हणून त्यांनी अल्पावधीतच एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
उमरगा येथील स्वातंत्र्यपूर्व काळातील नावाजलेल्या भारत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी महाविद्याल यात ते ज्ञानदानाचे काम करीत आहेत. निलंगा येथील सेवानिवृत्त तहसीलदार श्री आनंदराव पिटले साहेब यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांच्या या यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री अमोल मोरे, उपाध्यक्ष श्री अश्लेष मोरे, सचिव पद्माकर हराळकर, प्राचार्य डॉ. घनशाम जाधव, तसेच निलंगा येथील प्राचार्य डॉ.माधव कोलपुके, मराठी विभागाचे प्रमुख डॉ.भास्कर गायकवाड, डॉ.भगवान वाघमारे, डॉ.बालाजी गायकवाड, औराद शहाजनी येथील प्रेमचंद बियाणी,धोंडीराम मिरगुडे, गोकुळ मतकंटे, आनंद भारत गॅसचे वितरक सुधाकर जाजनुरकर, अंबिका भारत गॅसचे वितरक मधूकर आवले आदी मित्र परिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.