रहेमानिया उर्दु हायस्कुल औराद शहा. चा 88% निकाल
निलंगा – येथील रहेमानिया उर्दु हायस्कुल औराद शहा. येथील इ. १० वी बोर्ड फेब्रु मार्च 2023 परीक्षा निकाल नुकताच जाहीर झालेला असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांनी यश संपादन करुन शाळेचे नावलौकिक वाढविला आहे.
शाळेतून कारखेले महेक फारुख या विद्यार्थीनीने 90.40 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच शेख फारियाल मुनीर 82.60 टक्के गुण घेऊन द्वितीय तृयीय लष्करे सादिया इरफान80.80% व पटेल सानिया फारुख व पर्तापुरे उमेमा सलीम यांनी संयुक्त रित्या 80.40 टक्के गुण घेऊन क्रमांक प्राप्त केला आहे.गुणवंत विद्यार्थ्यांचे रहेमानिया तालिमी सोसायटीचे अध्यक्ष मंजूर अहेमद देशमुख,संस्था सचिव फारुख अहेमद देशमुख, शाफिक अहेमद देशमुख, शाळेचे मुख्याद्यापक,
सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.