भारतीय शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश टिकैत यांनी महिला कुस्तीपटूंना न्याय मिळावा यासाठी आता राष्ट्रपतींनाच साकडं घालण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातील अलिगड येथे शेतकऱ्यांची महापंचायत भरवण्यात आली होती. त्यावेळी बोलताना राकेश टिकैत यांनी महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा राष्ट्रपतींकडे नेणार असल्याचे सांगितले
rakesh tiket म्हणाले की, ‘आम्ही शांततेने आमचे म्हणणे मांडत आहोत. या ठिकाणीही अनेक निर्णय झाले आहेत. ते निर्णय राखून ठेवण्यात आले आहेत. मात्र आम्ही राष्ट्रपतींना भेटणार आहोत. शेतकऱ्यांच्या पंचायतीने ठरवले आहे की खाप प्रतिनिधी राष्ट्रपतींची भेट घेतली. मात्र या बाबतचे अजून जे निर्णय होतील ते कुरूक्षेत्रमधून होतील. मात्र या लढाईत खाप पंचायत आणि महिलाकुस्तीपटू हरणार नाहीत. ही लढाई लढली जाईल. त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाहीलैंगिक शोषणाचा आरोप करत बृजभूषण सिंह यांच्याविरूद्ध आंदोलन करणाऱ्या भारतीय महिला कुस्तीपटूंविरूद्ध दिल्ली पोलीसांनी बळाचा वापर केल्यानंतर या प्रकरणाची दखल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने देखील घेतली. त्यांनी वक्तव्य प्रसिद्ध करत दिल्ली पोलिसांनी पदक विजेत्या महिला पटूंना दिलेल्या वागणुकीबद्दल कडक शब्दात फटकारले.IOC ने आपल्या वक्तव्यात म्हटले की, ‘भारतीय कुस्तीपटूंना मिळालेली वागणूक ही अत्यंत वाईट आणि हादरवणारी होती. पटूंनी केलेल्या आरोपांची स्थानिक कायद्याच्या चौकटीत बसणारी निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी IOC मागणी केली.’याचबरोबर आयओसीने भारतीय कुस्ती महासंघाला 45 दिवसात निवडणूक घेतली नाही तर बंदी घालण्याची धमकी देखील दिली आहे.