मुंबईः एकीकडे उद्धव ठाकरे परदेशात असतांना शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांच्या भेटीला गेले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर पवार हे पहिल्यांच्या एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्याने राजकीय अर्थ काढले जात आहेत.शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्रितपणे माध्यमांशी संवाद साधणार असल्याचं सांगितलं जातं आहे. भाजप नेते राम कदम यांनी बोलतांना सांगितलं की, यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. एका पक्षाचा प्रमुख राज्याच्या प्रमुखाच्या भेटीला गेला आहे. त्यामुळे यातून दुसरा काहीही अर्थ नाही.उभय नेत्यांमध्ये तब्बल ४० मिनिटे चर्चा झाली आहे. सुरुवातीला हे नेते माध्यमांना एकत्रित बोलणार असल्याची माहिती होती. मात्र भेटीनंतर शरद पवार निघून गेलेले आहेत.
उभय नेत्यांमध्ये तब्बल ४० मिनिटे चर्चा झाली आहे. सुरुवातीला हे नेते माध्यमांना एकत्रित बोलणार असल्याची माहिती होती. मात्र भेटीनंतर शरद पवार निघून गेलेले आहेत.
मराठा मंदिर संस्थेला ७५ वर्ष पूर्ण झाली. त्याच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहावे, यासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचंही सांगितलं जातं. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शरद पवारांनी व्यक्तिगत कामासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यातून दुसरा काही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. ही भेट राजकीय नव्हती, असं मुनगंटीवार म्हणाले.सायंकाळी अचानकपणे शरद पवार शिंदेंच्या भेटीला गेल्याने सर्वच माध्यमांच्या नजरा उंचावल्या. त्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय उलथापालथ होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. २०१९नंतर राज्यात कधी काय होईल, याचा नेम नाही. त्यामुळे अचानकपणे सगळेच जण स्तब्ध झाले होते.