अहमदनगरचं नाव लवकरच अहिल्यानगर होणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि. 31 मे 2023) चौंडीत केली. नगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री शिंदे आज चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात बोलत होते.
गेल्या अनेक दिवसांपासून नगर जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत होता. काही दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर थेट विधीमंडळात उपस्थित केला होता. त्यानंतर नगर जिल्ह्यात चांगलच राजकारण तापलं होतं. गोपीचंद पडळकरांच्या या मागणीवर भाजप नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि नगरचे खासदार सुजय विखे पाटील हे फारसे उत्सुक नसल्याचं दिसून आलं होतं.”बाहेरच्या लोकांनी येऊन नामांतराविषयी भाष्य करू नये. गोपीचंद पडळकर हे माझे मित्र असून मी त्यांच्याशी बोलेल. त्यांच्या भावना होत्या त्या त्यांनी व्यक्त केल्या. नामांतराच्या प्रश्नाचे विनाकारण काही लोक राजकारण करत आहेत. मात्र, आम्ही पक्षांतर्गत बसून यावर चर्चा करू”, असं विखे पाटील स्वत: म्हणाले होते.तर खासदार sujay vikhe patil यांनीही पडळकरांच्या भूमिकेशी असहमती दर्शवली होती.”कारण नसताना हा विषय उपस्थित करून समाजात विष कालविण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असा आरोपही खासदार विखेंनी पडळकरांवर केला होता.पण आज (दि.31 मे 2023) चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री यांनी अहमदनगरचं नाव लवकरच अहिल्यानगर होणार असल्याची मोठी घोषणा केली. या घोषणेनंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वत:व्यासपीठावर जावून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे हा निर्णय घेतल्याबद्दल आभार मानले.दरम्यान,ahmadnagar च्या नामांतरासाठी फारसे उत्सुक नसलेल्या विखे पाटलांवर मुख्यमंत्र्यांनी नामांतराची घोषणा केल्यानंतर आभार मानण्याची वेळ आली. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चेला उधाण आलं आहे.