आगामी काळात होणाऱ्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे तयारी सुरु करण्यात आली आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागातर्फे aurangabad छत्रपती संभाजीनगरमध्ये १७ व १८ जूनला राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधीपक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत.
पक्षाच्या सर्व आघाड्यांचे तीनशेहून अधिक प्रतिनिधी शिबिरात सहभागी होतील, अशी माहिती राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, शिबिर संयोजक प्रा. सुनील मगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ncp पडेगाव येथील सिल्व्हर लॉनमध्ये १७ जूनला अजित पवार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन हो sharad pawar यांच्या उपस्थिती शिबिराचा समारोप होणार आहे.
सध्याची राजकीय, सामाजिक परिस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेली लोकशाही मूल्ये, आरक्षण, शैक्षणिक सवलती आदी भाजपच्या माध्यमातून कशी पायदळी तुडवली जात आहेत, यावर शिबिरात चर्चा होणार आहे. ajit pawar राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका प्रभावीपणे मांडण्याच्या उद्देशाने सहा सत्रांत हे शिबिर होईल.
रावसाहेब कसबे, संजय औटे, प्रा. एम.आर. कांबळे, जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी आदी वेगवेगळ्या विषयांवर भूमिका मांडतील, असे गायकवाड व मगरे यांनी सांगितले. यावेळी माजी राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा प्रमुख, पदाधिकाऱ्यांची बैठक शहरात झाली.
संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे, अशी मागणी होती. तसे न झाल्याने आम्ही या प्रकाराचा निषेध करतो, असे गायकवाड म्हणाले. देशाची राज्यघटना धर्मनिरक्षेप असताना नव्या संसदेत वैदिक पद्धतीने विधी करण्यात आला. राष्ट्रपती देशाचे प्रमुख असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. यातून पंतप्रधानांनी राज्यघटनेला डावलले, असा आरोप त्यांनी केला.