तुपडी येथे गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार अभियानाचा शुभारंभ
निलंगा : निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पातील तुपडी शिवारात जलसंपदा विभागाच्या वतीने शासन आपल्या दारी उपक्रम अंतर्गत गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानाचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांच्या शुभहस्ते रविवार दिनांक २८ मे रोजी करण्यात आला.
यावेळी अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, चेअरमन दगडू साळुंके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव ममाळे, निलंगा बाजार समिती चे उपसभापती लालासाहेब देशमुख, बाजार समिती चे संचालक गुंडेराव जाधव, अंबुलगा चेअरमन अरविंद चव्हाण, मसलगा माजी सरपंच रमेश पाटील, बाजार समिती संचालक अरविंद पाटील, नागेश पाटील, शेंद चे माजी सरपंच बालाजी मोगरगे, बाजार समिती चे संचालक जनार्धन सोमवंशी, बाजार समिती संचालक अनिल कामले, बाजार समिती संचालक हणमंत पाटील, बाजार समिती संचालक श्रीरंग हाडोळे, संजय कदम, डांगेवाडी चे सरपंच प्रतिनिधी प्रताप सुडे, उपसरपंच संजय हुलसुरे, बुजरुकवाडी चे माजी सरपंच दिनकर पाटील, शत्रुघ्न पवार, प्रशांत वाघमारे, तुपडी चे सरपंच प्रतिनिधी विशाल गोरे, प्रशांत येळकर, माजी पंचायत समिती सदस्य श्रीमंत जाधव आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.