IPL 2023 Final : चेन्नई-गुजरात सामन्यात पावसाचा ख्वाडा, पुढे काय?
CSK vs GT Final IPL 2023: चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये फायनलचा थरार रंगणार आहे. पण अहमदाबादमध्ये सध्या वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. पावसामुळे सामन्याला उशीरा सुरुवात होण्याची शक्यता आहे. पण आज जर पाऊस थांबलाच नाही, तर आयपीएलकडून काही नियम तयार करण्यात आलेले आहे. आज जर कमीत कमी पाच षटकारांचा सामना झाला नाही. तर रिझर्व डेला सामना होणार आहे.
रिझर्व डे सोमवारी ठेवण्यात आला आहे. आजही एकही चेंडू पडला नाही, तर फायनलचा थरार उद्या पाहायला मिळणार आहे. पण सोमवारीही पाऊस पडला तर विजेता कोण होणार …याची उत्सुकता लागली आहे. जर सोमवारी पावसामुळे सामना झाला नाही.. गुजरातला विजेता घोषित करण्यात येणार… कारण, साखळी फेरीत गुजरातचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे.
याशिवाय पावसामुळे सामन्यात विलंब झाल्यास आवश्यक 20 षटकांपैकी काही षटकांची संख्या कमी केली जाण्याचीही शक्यता आहे. यानुसार, प्रत्येक संघाला किमान पाच षटके फलंदाजी करण्याची संधी मिळेल. आजच्या सामन्यासाठीची शेवटची वेळ रात्री 12.26 वाजता असेल, त्यानंतरही सामना न झाल्यास हा सामना सोमवारी खेळवण्यात येईल. सोमवारीही पावसाने ख्वाडा घातल्यास गुजरातचा संघ विजेता होईल.
अहमदाबादच्या पावसाचा आयपीएल फायनलला तडाखा बसलाय. फायनल सुरु होण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. पावसानं आजच्या दिवसावर पाणी फेरलं तर फायनलसाठी उद्याचा दिवस राखीव आहे
रात्री ९.३५ वाजेपर्यंत खेळ सुरु झाला तर फायनल २०-२० षटकांची होणार आहे. रात्री ९.३५ वाजल्यानंतर खेळ सुरु झाला तर फायनलची षटकं कमी होणार आहेत. रात्री ११.५६ वाजता खेळ सुरु झाला तर फायनल पाच-पाच षटकांची होणार आहे. आज खेळ सुरु झाल्यावर पुन्हा पाऊस आल्यास उर्वरित सामना राखीव दिवशी होईल.
IPL फायनल आज सामना झाला तर…
CSK Vs GT Final overs per side on timing
9.45pm – 19 षटकांचा सामना होईल.
10.30pm – 15 षटकांचा सामना होईल.
11pm – 12 षटकांचा सामना होईल.
11.30pm – 9 षटकांचा सामना होईल