रिफायनरी प्रकल्पा न राज्य सरकार आणि स्थानिक ग्रामस्थांमधील वाद अद्यापही सुरूच आहे. येथील ग्रामस्थांचा या प्रकल्पाला विरोध असून आता बारसू येथे ग्रामस्थांच्यावतीने सरकारचे श्राद्ध घालण्यात आले आहे. ग्रामस्थांनी श्राद्ध घालत बोंबा मारल्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बारसू प्रकल्पाचा मुद्दा चर्चेत आला आहे. राजापूर तालुक्यातील बारसूमधील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी माती परीक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, अद्यापही बारसूला विरोध असणारे आंदोलक मात्र शांत झालेले दिसत नाहीत. बारसु-सोलगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शनिवारी रिफायनरी प्रकल्प राबवू पाहणाऱ्या सरकारचे श्राद्ध घालत आपला निषेध व्यक्त केला आहे.
ज्या ठिकाणी माती परीक्षण करण्यात आले त्या ठिकाणी एका बोअर जवळ श्राद्ध घालण्यात आलं. तसेच सरकारच्या नावाने बोंबा मारण्यात आल्या आहेत. यावेळी काही ग्रामस्थांनी आपले मुंडनही करून घेतले होते.
नाणार येथे रिफायनरी प्रकल्पा पस्तावित झाल्यानंतर नागरिकांनी मोठा विरोध केला. त्यामुळे शासनाला प्रकल्पाची अधिसूचना रद्द करावी लागली होती. त्यानंतर बारसू परिसरात रिफायनरी प्रकल्प उभारण्यासाठी या परिसरात माती परीक्षणाचे काम हाती घेण्यात आले. पण या ठिकाणीही स्थानिकांनी मोठा विरोध दर्शविलात्यानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात 25 एप्रिलपासून बारसू येथील सड्यावर माती परीक्षणाचे काम सुरू करण्यात आले. माती परीक्षणाला सुरूवात झाल्यानंतर ग्रामस्थांनी या कामाला विरोध दर्शविला. यावेळी police आणि आंदोलकांमध्ये संघर्षही झाल्याचे पहायला मिळाले. पण त्यानंतरही पोलीस बंदोबस्तात माती परीक्षणासाठी ड्रिलिंगचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतररिफायनरी प्रकल्पा विरोधी आंदोलन शांत झाल्याचे दिसत होते. मात्र, शनिवारी बारसू-सोलगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकत्र येत ज्या ठिकाणी माती परीक्षणासाठी बोअर खोदण्यात आले त्या बोअरजवळ सरकारचे पिंडदान करत सरकारच्या नावाने बोंबा मारल्या. तसेच काही ग्रामस्थांनी आपले मुंडन करत सरकारचा निषेध केला.
बारसु – सोलगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जबरदस्तीने, दडपशाही करून रिफायनरी राबवू पाहणाऱ्या सरकारचे श्राद्ध घातले.#refinery #ViralVideo #SakalNews pic.twitter.com/yIVNOfIpLU
— SakalMedia (@SakalMediaNews) May 27, 2023