दिल्ली विद्यापीठाने कवी मोहम्मद इक्बाल यांना अभ्यासक्रमातून हटविण्याचा निर्णय घेतला आहे. इक्बाल यांच्यावरील पाठ बीए राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात शिकवला जात आहे. त्या ऐवजी आता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयीच्या पाठाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे
त्यामुळे दिल्ली विद्यापीठात आता ‘सारे जहाँ से अच्छा’ लिहिणारे इक्बाल यांच्यावरील पाठ अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात येणार आहे. दिल्ली विद्यापीठाची अधिसभा नुकतीच झाली. यात विद्यापीठाचे कुलगुरु दिनेश सिंह यांनी ही माहिती दिली.दिल्ली विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या मंजुरीनंतर कवी इक्बाल अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात येणार आहेत. याशिवाय अन्य काही प्रस्तावांनाही अधिसभेनं मंजुरी दिली आहे. यापुढे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात फक्त राष्ट्रीय व्यक्तींचाच समावेश असेल, असा निर्णय अधिसभेच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे कुलगुरु दिनेश सिंह यांनी सांगितले.
बीए राज्यशास्त्राच्या पुस्तकार ११ प्रकरणे आहेत. यात राजा राममोहन राय, रमाबाई आंबेडकर, स्वामी विवेकानंद, mahatma gandhi डाँ. भीमराव आंबेडकर आदींचा समावेश आहे. या पुस्तकात आता सावित्रीबाई फुले यांच्याविषयीच्या पाठाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे. ‘सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्तान हमारा’ हे गाणे इक्बाल यांनी लिहिले आहे. त्यांना अल्लामा इक्बाल असेही म्हणतात.