मुंबई- इंटरनॅशनल इंडियन फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स ‘आयफा’ मोठ्या थाटात सुरू झाला आहे. अबुधाबीच्या यास बेटावर आयआयफाची २३ वा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. २६ मे रोजी रात्री Iifa च्या तांत्रिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली, यामध्ये आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ , ब्रम्हास्त्र आणि कार्तिक आर्यनचा चित्रपट ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटांनी अनेक पुरस्कार जिंकले.
सध्या या पुरस्कार सोहळ्याचे खूप फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आपापले लाडके कलाकार पाहून प्रेक्षकही उत्साहित होऊन हे व्हिडिओ व फोटो शेअर करत आहेत. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडी आणि ब्रम्हास्त्र चित्रपटाचा बोलबाला पाहायला मिळाला. तर सोबतच कार्तिक आर्यनच्या भूल भूलैया २ आणि दृष्यम २ चित्रपटाला ही चांगले यश मिळाले.यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार गंगूबाई काठियावाडीसाठी आलियाला तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विक्रम वेधासाठी ह्रतिक रोशनला देण्यात आला. तर जुग जुग जिया चित्रपटासाठी अनिल कपूर यांनी सर्वोत्कृष्ट सहाय्यक कलाकाराचा पुरस्कार जिंकला.तर प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ या मराठी चित्रपटाला सन्मानित करण्यात आलं.