• Wed. Apr 30th, 2025

लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे संकेत

Byjantaadmin

May 28, 2023

राज्यातील सर्वच राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागले आहे. असे असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने मात्र येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच् अनुषंगाने तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे 2024 होणाऱ्या या निवडणुकीच्या दृष्टीने तयारीसाठी सर्व जिल्ह्यांतील निवडणूक शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणुकीसंदर्भातील कामांशिवाय अन्य कामे देऊ नका, असे आदेश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे  यांनी दिले आहेत. त्यामुळे लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुकीची तयारी देखील निवडणूक आयोगाकडून केली जात आहे.

Maharashtra News Preparations for assembly elections begin with the Lok Sabha Indications due to the order of the Chief Electoral Officer लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे संकेत

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनंतर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत. ज्यात त्या त्या जिल्ह्यातील निवडणूक शाखांमधील कर्मचाऱ्यांना निवडणुकीव्यतिरिक्त अन्य कोणतीच कामे देऊ नयेत, आशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे निवडणूक विभागातील सर्वच कर्मचारी-अधिकारी सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागले आहेत. तसेच या काळात त्यांच्याकडे इतर कोणतेही इतर कामे दिले जात नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोग देखील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले असल्याचं पाहायला मिळत आहेत.

काय म्हटले आहे आदेशात?

निवडणूक आयोगाने काढलेल्या या आदेशात म्हटले आहे की, आगामी लोकसभा व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कामकाजाची जबाबदारी जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने तिथल्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या कर्मचारी वर्गावरच असते. भारतीय निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पूर्वतयारीसाठी ठरलेल्या योजनेनुसार सर्व कामे वेळेत व्हावीत यासाठी निवडणूक शाखेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांवर जबाबदारी राहणार आहे. त्यामुळे ज्यात त्या त्या जिल्ह्यातील निवडणूक शाखांमधील कर्मचाऱ्यांना निवडणुकीव्यतिरिक्त अन्य कोणतीच कामे देऊ नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकसभेबरोबर विधानसभेची तयारी सुरु?

पुढील वर्षे म्हणजेच एप्रिल 2024 मध्ये लोकसभेच्या आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष देखील तयारी करत आहे. राज्यातील एकंदरीत चित्र पाहता लोकसभेबरोबर विधानसभेच्याही निवडणुका होऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यामुळेच निवडणूक आयोग देखील त्याच दृष्टीने तयारी करत असल्याचं बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed