• Wed. Apr 30th, 2025

मिलिंद नगर बौद्ध नगर मधील स्मशानभूमीची दुरवस्था नवीन स्मशानभूमी…

Byjantaadmin

May 27, 2023

मिलिंद नगर बौद्ध नगर मधील स्मशानभूमीची दुरवस्था नवीन स्मशानभूमी बांधून देण्याची धम्मानंद काळे यांची मागणी

निलंगा:- निलंगा शहरातील मिलिंद नगर बौद्ध नगर मधील स्मशानभूमीचे नवीन बांधकाम करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष धम्मानंद काळे यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केले आहे, मिलिंद नगर बौद्ध नगर या ठिकाणची समशानभूमी फार वर्षापूर्वीची जुनी असून त्या ठिकाणी सर्वच बाजूने पडझड झालेली असल्याने अंत्यविधी करण्यास अनेक अडथळे निर्माण होत आहेत.तेथे पाण्याची सोय नाही,लाईटची सोय नाही,गेट नाही,कसलीही स्वच्छता नाही, संरक्षण भिंती चारी बाजूंनी मोडकळीस आलेल्या आहेत, आत मधील बांधकामास उभ्या भेगा पडलेले आहेत कोणत्याही क्षणी पडण्याची दाट शक्यता आहे अंत्यविधी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे सध्या बहुतांश ठिकाणी स्मशानभूमी ह्या अतिशय सुंदर,चांगलं सुशोभीकरण केलेल्या दिसून येत आहेत परंतु या ठिकाणी आजपर्यंत कोणीही लक्ष दिलेले नसल्यामुळे येथील समशानभूमीची दुरावस्था झालेली आहे.त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन स्मशानभूमीचे बांधकाम करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed