लातूर, दि.२६ माधव बावगे व चंद्रकांत गस्तगार यांच्या उपस्थितीत हानेगावे परिवाराचा मरणोत्तर देहदान संकल्प.
लातुर:-अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे व राष्ट्रसंत सत्यपाल महाराज यांच्या प्रेरणेने, भारतीय आयुर्विमा महामंडळ निलंगा शाखेचे विकास अधिकारी चंद्रकांत गस्तगार यांच्या उपस्थितीत, तगरखेडा नगरीचे सुपुत्र प्रदेश संघटक-जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र व संत गाडगेबाबा राष्ट्रीय महासचिव प्रबोधन मंचाचे सत्यवान निवृत्ती हानेगावे, पत्नी वैशाली सत्यवान हानेगावे, पुत्र विश्वजीत सत्यवान हानेगावे या परिवाराने डॉ. माधव लहाने (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) यांच्या सहकार्याने मरणोत्तर देहदानाचा फार्म विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे सर्व कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करून देताना आपल्या मरणानंतरचा देहदान संकल्प पूर्ण केला. सोबतच माधव बावगे यांनी आपल्या व पत्नीच्या मरणोत्तर देहदानाच्या फॉर्मचे पुनर्जीवन केले.