अरविंद पाटील निलंगेकर यांची प्रदेश संयोजकपदी नियुक्ती
प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यानी केली निवड
निलंगा/प्रतिनिधी
समर्थ बुथ अभियानाच्या माध्यमातून युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यानी संपूर्ण राज्यात भाजपा प्रदेश सचिव म्हणून पक्षाचे काम करत असताना बुथ रचना कार्यक्रम यशस्वीपणे राबवल्याने त्यांची महाराष्ट्र राज्याच्या संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकाळात भाजपा सचिव पदाची जबाबदारी स्वीकारत युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यानी मागील दोन वर्षात संपूर्ण राज्याचा दौरा करून बुथ व शक्तीकेंद्र प्रमुख रचना सक्षमपणे कार्यान्वित केली.त्यामुळे भारतीय जणता पार्टी महाविजय अभियान २०२४ या महत्त्वाच्या राज्य समितीमध्ये अरविंद पाटील निलंगेकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.२०२३ ते २०२४ या महत्वपूर्ण निवडणूक काळात लोकसभा,विधानसभा,स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणूका पार पडणार आहेत.गल्ली पासून दिल्ली पर्यंत भारतीय जणता पार्टीची सत्ता जनमताच्या आधारे प्रस्थापित करण्यासाठी बुथ जितोगे तो देश जितोगे हा संकल्प डोळ्यासमोर ठेवून भाजपा केंद्र समितीने व राज्य समितीने निवडणूकामध्ये विजय संपादनासाठी व केंद्र व राज्य शासनाचे जनहिताचे घेतलेले निर्णय समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचे कार्य शक्ती केंद्र प्रमुख व बुथ प्रमुख व पन्ना प्रमुख यांच्या माध्यमातूनच पार पडते त्यासाठी पक्षाने महत्वपूर्ण बुथ सशक्तीकरण अभियान सक्षमपणे यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने बूथ शशक्ती करणाची प्रदेश संयोजकाची महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे,भाजपा विजयी संकल्प 2024 यशस्वी पार पाडण्यासाठी शक्तिकेंद्र व बूथ रचना यात शसूत्रता आणून ते पूर्णत्वास नेण्याचे कार्य आपण आपल्या संघटन कौशल्याने उत्तम प्रकारे पार पाडाल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्ती पत्रात व्यक्त करून शुभेच्छा दिल्या आहेत,