• Thu. May 1st, 2025

गौतमी ‘पाटील’ नावाची बदनामी करतीये, आडनाव बदलावं अन्यथा…”; गौतमीला इशारा

Byjantaadmin

May 25, 2023

गौतमी ‘पाटील’ नावाची बदनामी करतीये, आडनाव बदलावं अन्यथा…”; गौतमीला इशारा

पुणे:-प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील नेहमी आपल्या नृत्याने सर्वांना भुरळ घालते. कोणत्याही ठिकाणी तिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी असते. मात्र, ती तिच्या नृत्यामुळे कायम वादात सापडते. तिच्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात यावी, अशी मागणी अनेकांकडून करण्यात आली आहे. अशात गौतमी तिच्या नृत्यावरून नाही, तर आडनावावरून वादात सापडली आहे.
गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या आडनावावरून पुण्यात मराठा संघटनेची बैठक झाली. गौतमीचे आडनाव पाटील नसल्याचा दावा या बैठकीमध्ये करण्यात आला आहे. गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. गौतमी पाटील हे नाव वापरून पाटील यांची बदनामी करत आहे. तिने हे आडनाव लावू नये, असा इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान, गौतमी पाटील (Gautami Patil) कडून याबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, आपल्या आडनावाच्या वादावर गौतमी काय प्रतिक्रिया देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज (25 मे) संध्याकाळी सात वाजता गौतमीचा विरारमध्ये एक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमानंतर ती माध्यमांची बोलण्याची शक्यता आहे.

अल्पकालावधीत गौतमी पाटील (Gautami Patil) आपल्या नृत्याने प्रसिद्ध झाली आहे. तिच्या नृत्यावर अनेकांकडून आक्षेप घेण्यात आला होता. तिच्या नृत्यावर मराठी सिनेक्षेत्र ते लावणी कलाकारापर्यंत सर्वांनी प्रतिक्रिया देत तिचा विरोध केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *