• Sun. May 4th, 2025

शिक्षकांनी नवीन पिढीला दिशा दिनाचे कार्य करावे युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे प्रतिपादन

Byjantaadmin

Oct 21, 2022

शिक्षकांनी नवीन पिढीला दिशा दिनाचे कार्य करावे युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे प्रतिपादन

महाराष्ट्र शिक्षक काँग्रेस च्या वतीने सहकार भूषण पुरस्कार माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना तर वाचन प्रेरक पुरस्कार रीडच्या सौ दीपशिखा धीरज देशमुख यांना युवराज संभाजी राजे च्या हस्ते प्रदान

लातूर ;-छत्रपती शाहू महाराजांनी विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करत बहुजन समाजातील लोकांना सक्तीचे शिक्षण मोफत देण्याचे काम केले शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याने कल्पक नाविन्यपूर्ण शिक्षण दिल्याशिवाय दिशा मिळणार नाही त्यासाठी शिक्षकांनी नवनवीन वेगवेगळे संस्कार घडवून नविन पिढीला दिशा देण्याचे काम करावे असे आवाहन युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले आहे ते लातूर येथे गुरुवारी सायंकाळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षण सभा यांच्यावतीने आयोजीत विलासराव देशमुख ज्ञानरत्न व उपक्रमशील शाळा पुरस्कार आणि जिल्ह्यातील शिक्षकां चा व सहकार भूषन पुरस्कार माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना तर वाचन प्रेरक पुरस्कार रिड लातूरच्या प्रमुख सौ दीपशिखा धीरज देशमुख यांना शानदार सोहळ्यात युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार विक्रम काळे, आमदार धीरज विलासराव देशमुख, शिक्षक काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष कालिदास जी माने, छावा संघटनेचे युवक आघाडीचे अध्यक्ष विजयकुमार घाडगे, शिक्षक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशव गंभीरे, सौ रेशमा गंभीरे , जिल्हा बँकेचे माजी चेअरमन अँड श्रीपतराव काकडे, माधव गंभीरे आदी व्यासपिठावर उपस्थित होते

यावेळी पुढें बोलताना युवराज छत्रपती संभाजी राजे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांनी आठरा पगड जातींच्या कल्याणासाठी प्रयत्न केले सर्वांना सोबत घेऊन मदत करण्याची भूमिका घेतली तीच भूमिका आम्ही पुढें घेवून वाटचाल करीत आहेत असे सांगून कोल्हापूर येथे सहकार चळवळ उभी करायचे काम शाहू महाराजांनी केले मात्र आताची मंडळी सहकार क्षेत्र मोडीस कसे नेता येईल याकडे लक्ष देत असल्याची खंत व्यक्त केली

*विलासराव देशमुख साहेब यांच्या मुळे शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा राहिला*

रायगड ही छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी तेथेच त्यांचा राज्यभिषेक सोहळा झाला त्याच ठिकाणी त्यांना छत्रपती ही पदवी मिळाली १९८o साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी तेथे आल्या होत्या तिथे काहीच दिसत नव्हते तेव्हा त्यांनी इथे काही तरी करा अशा सूचना दिल्या तेव्हा मेघडम्बरी उभी केली तेव्हा विलासराव देशमुख यांच्या कडे मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्याची मागणी केली तेव्हा त्यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळेच शिवाजी महाराजां चा पुतळा उभा मी करू शकलो त्यांच्या कार्याचे कौतुक यावेळी युवराज संभाजी राजे यांनी केले तसेच
लोकनेते विलासराव देशमुख व आमच्या कुटुंबाचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते त्यांनीच मला विधानसभेसाठी विशेष प्रयत्न करून संधी दिली अशा अनेक आठवणींना उजाळा दिला त्यावेळी टाळ्यांचा गजर सुरु झाला

*महाराज तुमचे जसे सर्वांचे आहेत*
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे प्रतिपादन

यावेळी बोलताना राज्याचे माजी मंत्री सहकार भूषन दिलीपराव देशमुख म्हणाले की त्या काळात छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे सहकार चळवळ रुजवली पुढें ही चळवळ यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील यांनी पुढें न्यायचे कार्य केले शाहू महाराजांनी रयतेच्या आपली तिजोरी खुली केली त्याच पद्धतीने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने देशात पहिल्यांदा पाच लाख रुपयांपर्यंत शून्य दराने कर्ज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला तेही बँक नफ्यात चालवून तो निर्णय कायम ठेवला असून पुढें बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले की छत्रपती महाराजांच्या गादीचे युवराज संभाजी राजे भोसले वारसदार आहेत सर्वसामान्याच्या मनात प्रेमा मुळे त्यांचें सिंहासन सर्व सामान्य माणसासाठी, मर्गळणाऱ्या समाजाला एकत्र आणण्यासाठी तुमचे वजन राजकीय कमी सामाजिक जास्त आहे तुमच्याकडून युवकांना मार्गदर्शन व्हावे अशी अपेक्षा करून छत्रपती संभाजीराजे भोसले महाराजांना चौकटीत बांधू नका जसे तुमचे आहेत तसे ते सर्वांचे आहेत असेही ते यावेळी म्हणाले..

यावेळी आमदार विक्रम काळे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी जिल्ह्यातील शिक्षक शाळांना विलासराव देशमुख ज्ञानार्जन पुरस्कार प्रमुख अतिथी यांच्या हस्ते देवुन त्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध संस्था पदाधिकारी, संस्थाचालक कार्यकर्ते शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *