युवक काँग्रेस तर्फे नगर पालिकेस निवेदनासह टावेल, टोपी, श्रीफळ व 11रुपये आहेर
निलंगा (प्रतिनिधी):- निलंगा शहरातील वारंवार विस्कळीत होत असलेल्या पाणीपुरवठेवर संताप व्यक्त करत निलंगा युवक काँग्रेस तर्फे गांधींगिरी पद्धतीने नगरपालिकेस टॉवेल, टोपी, श्रीफळा सह 11 रुपये आहेर म्हणून देण्यात आले
चांगला पाऊस असून धरणात मुबलक पाणी साठा असताना बिलाची थकबाकी करून वारंवार सणासुदीला पाणी पुरवठा खंडित केला जात असल्यामुळे मागे युवक काँग्रेस तर्फे हलगी नाद तसेच बिनबुडाची घागर व कोरा निवेदन देऊन निषेध केला असता तात्पुरता ते प्रश्न मार्गी लागले.24 तास पाणी पुरवठा अशे खोटे आश्वासन तात्कालीन भाजप ने दिले व चालू असलेले बोर बंद करण्यात आले सध्या सना सुदीच्या वेळी पुन्हा पाणी पुरवठा विस्कळीत झाला ते त्वरीत सुरळीत करण्यात यावे अन्यथा गुरुवारी भीक मागो आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील, माजी नगरध्यक्ष हमीद शेख, युवक काँग्रेस शहरध्यक्ष मुजीब सौदागर, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हसन चाऊस, अशोकराव मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोपने, तुराब बागवान, आवेज शेख, साजन शिंदे, अजय कांबळे, माजी नगरसेवक अजित नाईकवाडे,लहुजी शक्ती सेनेचे गोविंद सूर्यवंशी, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष प्रमोद कदम,माजी उपनगरध्यक्ष अरविंद कांबळे,रोहित बनसोडे आदी उपस्थित होते